प्रतिभाला समोर करून शरदने आदिवासी लोकांची जमीन हडपली !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
गडचांदूर
येथील सर्वे नंबर ९३/१ चित्रपट१/१६ आकारणी ३३५ भोगवटदार एक ही जमीन गडचांदूर येथील माधुरी टेकाम, भूषण देवी आत्राम, सुशीला तुमराम, माया कोडापे यांच्या नावे वडोलोपार्जित जमीन प्रतिभाला सामोर करून शरद जोगी यांनी आदिवासी लोकांची जमीन हडपली असल्याचे आज पत्रकार परिषद माधुरी टेकाम, भूषण देवी आत्राम, सुशीला तुमराम, त्यांनी सांगितले. ते म्हणाले की प्रतिभा सुधाकर टेकाम यांना ती धरून चारही बहिणी चा अशिक्षित पणाचा अज्ञातपणाचा फायदा घेऊन सदर शेत जमीनीवर कब्जा करून त्या जमिनीवर कच्चा लेआउट टाकून, प्लॉट पाडून गडचांदूर तालुक्यातील कर्मचारी, शिक्षक यांना विक्री करण्यात आले असल्याची माहिती सांगितली. शरद जोगी यांनी आदिवासींना हाताशी धरून अनेक भोळ्या भाबड्या आदिवासी लोकांच्या जमिनी हडपल्याचे वृत्ते ही यापूर्वी माध्यमांमध्ये आले होते.
आमच्या नावे असलेली वडीलोपार्जित शेतीची जमीन सर्वे क्रं. ९३/१ त्यावर अनाधीकृत पणे कच्चा ले-आऊट टाकून परस्पर १०-११ लोकांना विक्री केले. व त्याच्या कडून ५लाख रु., १० लाख रु. अशा प्रमाणात रक्कम वसूल करण्यात आली. सदर जमीन बलजबरीने हडप करत असतांना माझ्या तिध्याही बहिणी यांच्याकडून हक्कसोड पत्र दिनाक ३१.०१.२०२४ ला बळजबरीने लिहून घेतले. लगेच त्याच शेतीचा करारनामा ३१.०१.२०२४ ला लिहून घेतला. एकाच दिवशी करारनामा व हक्कसोड पत्र लिहुन घेणारे व दबाब टाकणारे व राहत्या घरून बळजबरीने ऊचलून नेणारे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा नेता शरद जोगी यांनी आपल्या सोबत चारचाकी वाहनामध्ये गुंडप्रवृतीचे लोक आणून माझ्या बहिणींना राहत्या घरून गडचांदूर मधूर घेऊन गेला. व राजूरा बामनवाडा इथे राहणारी माझ्या भावाची बायको प्रतीभा सूधाकर टेकाम हिने व शरद जोगी यांनी हक्कसोड पत्र करारनामा यांच्यावर बळजबरीने सह्या घेतल्या त्यामध्ये माझी बहीण भूषणदेवी लटारी आत्राम, सुशीला सुधाकर तुमराम, माया वामन कोडापे यांनी भीती पोटी जीव वाचविण्याच्या धोक्यामध्ये सहया करून दिल्या. त्यानंतर त्यांनीच शरद जोगी व इतर गुंडप्रवृत्तीच्या लोकांनी माझ्या बहीणीना गडचांदूर इथे राहत्या घरी सोडून दिले. यासंदर्भात मला माहीती मिळाली असता मी स्वतः यासंदर्भातील गडचांदूर येथील पोलीस निरीक्षक गडचांदुर, जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांना तक्रार केली त्यावर मला आतापर्यत कुठलाही न्याय मिळाला नाही. त्या करीता माननीय पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली असल्याचे सांगितले.
विशेष म्हणजे माझी बहीण लटारी आत्राम, सुशीला सुधाकर तुमराम, माया वामन कोडापे आमची शेती व सर्वे ९३/१ आर/जी १.१८ या संदर्भातील कायदेशीर जमीन आपल्या ताब्यात गैरापासुन बचाव करण्याकरीता अधीकार पत्र दि.१० जानें. २0२६ रोजी लिहून दिले आहे. तरी आमची जमिन हडप करणारी प्रतिभा सुधाकर टेकाम रा. गडचांदुर हल्ली मुक्काम राजूरा वामनवाडा त्यांना मदत करणारा राष्ट्रवादी कांग्रेसपक्षचा नेता शरद जोगी यांच्यावर कायदेशीर रित्या कारवाही करण्यात यावी व आम्हा सर्व कुटुंबातील सदस्यांना न्याय मिळवून देण्यात यावा. अशी मागणी आज पत्रकार परिषदेतून त्यांनी केली.
