'त्या'विषयी समितीच्या निवडणुकीत पक्षपात, मुख्याधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
गडचंदुर नगर परिषदेत नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांच्या मन मर्जीने विषय समिती निवडणुकीमध्ये चुकीचे सभा वृत्तांत, इतिवृत्त लिहून नगरसेवकांची व शासनाची दिशाभूल केली. पिठासीन अधिकारी गडचांदूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आशिष चव्हाण त्यांची निवड करण्यात आली होती. परंतु त्यांनी नगर परिषद विषय समितीच्या निवडणुकीमध्ये पक्षपात केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी गडचांदूरचे मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आज पत्रकार परिषदेतून केली.
गडचांदूर नगरपरिषद मध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. विशेष सभेचे आयोजन केले असता. नगर परिषदेत काम का चालवण्याकरिता समित्या गठन करणे आवश्यक असतात. त्यात सार्वजनिक बांधकाम वित्त समिती , आरोग्य व स्वच्छता समिती, पाणीपुरवठा समिती, महिला व बालकल्याण समिती, शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक समिती अशा पाच समितेचे गटन करण्यात आले. या विविध समित्यावर किती सदस्य असावे या विषयावर पिठासीन अधिकाऱ्याकडून चर्चा करण्यात आली असता. समितीमध्ये जास्तीत जास्त पाच व कमीत कमी तीन सभासद असावे असे सांगण्यात आले. मात्र नवनिर्वाचित नगराध्यक्ष अध्यक्ष यांनी आपली बुद्धी लावून समितीमध्ये चार सभासद असावे अशी मागणी केली. त्यावर विरोधी पक्षाने आक्षेप घेतला असताना सुद्धा सत्ताधाऱ्यांनी आठ विरुद्ध बारा असे बहुमत सिद्ध केले. आणि ठराव मंजूर करून घेतला. पिटासन अधिकाऱ्यांच्या लक्षात येत संख्याबळानुसार आपल्या मित्र पक्षाला एक सदस्य कमी होत असल्याची चूक लक्षात येताच पुनश्चा सत्ताधारी पक्षाने ठराव बदलण्याची मागणी केली. ठराव पारित झालेला तो बदलणार नाही अशी भूमिका मांडली. तरीपण पिठाशीन अधिकाऱ्याने पक्षपात करून सत्ता पक्षाची बाजू सावरत बदलता येईल अशी भूमिका घेतल्याने विरोधी पक्षाने पीठासीन अधिकाऱ्याचा निषेध करत सभेवर बहिष्कार टाकला व सभागृहातून बाहेर पडले. सभागृहाच्या दारावरच ठिय्या आंदोलन केले.
विरोधी पक्षाचा कोणताही जनाधार न घेता पिठासीन अधिकाऱ्यांनी पक्षपात करून विविध विषय समित्या निवडल्या. परंतु महिला व बालकल्याण समिती अनिवार्य असताना ते निवडल्या गेली नसल्याचा आणि महिलावर अन्याय झाल्याचा आरोप आज पत्रकार परिषदेतून भाजप नेते अरुण डोये, नगरसेवक तथा गट नेता सतीश बेतावर, स्वीकृत सदस्य सतीश उपलंचिवार, नगरसेवक सुरज पांडे, सपना सेलोकर नगरसेविका, शितल धोटे नगरसेविका, कीर्ती वैरागडे नगरसेविका, यांनी केला आहे.
पिठासीन अधिकाऱ्याच्या या पक्षपाती धोरणाविरोधात कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागितली आहे.
