मनपा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे अमृत योजनेचे हजारो लिटर पाणी रस्त्यावर!




मनपा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे अमृत योजनेचे हजारो लिटर पाणी रस्त्यावर!

सुपरवायझर तुषार चौधरीची मुजोरी !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
शहरातील महाकाली वार्ड व भिवापूर वार्ड येथे पाणीपुरवठा करणारी अमृत योजनेची पाईप लाईनचे वाँल फुटल्याने हजारो लिटर पाणी वाहत आहे.
एकीकडे नागरिकांना चार - चार दिवस पाणीपुरवठा होत नाही. नहाक त्रास होत असल्याची बाप समोर येत आहे.
महानगरपालिकेच्या अमृत योजनेचे, अमृत चंद्रपूर शहरातील नागरिकांना मिळावं यासाठी हजारोकोटी रुपये खर्च केले. पाच -सहा वर्ष होऊ नये, या अमृत योजनेचे पाणी नागरिकांना मिळत नाही. जिथे पाण्याच्या टाक्या तयार केल्या त्यात टाक्याच्या पाण्याच्या लाईनच्या पाईप वाँल मधून मनपा प्रशासनाच्या ढिसाळ योजनेने हजारो लिटर पाणी रस्त्यावर व्यर्थ वाहत आहे. मागील साडेचार वर्षापासून महानगरपालिकेत महापौर- नगरसेवक नसल्याने पालिकेचे पाणी व्यवस्थापक, सुपरवायझर वॉल मॅन,कर्मचारी यांची मन मर्जी सुरू होती. ती आताही महानगरपालिकेत महापौर- नगरसेवक आल्यानंतरही जशीच्या तशीच असल्याचे चित्र दिसून येत आहे. नगरसेवकांनी सुपरवायझरला फोन केल्यानंतरही ते त्याचे ऐकत नसल्याची बाब समोर येत आहेत. एवढेच नाही तर, सामान्य माणसाने सुपरवायझरला फोन केले तर आम्ही तुमचे फोन उचलण्यासाठी आहोत का? आम्हाला दुसरे काम नाहीत का? तुम्ही आमचे अधिकारी आहात का? असे उद्धट उत्तर सुपरवायझर तुषार चौधरी यांनी दिले. मनपा प्रशासनातील हे कर्मचारी जनतेच्या सेवेसाठी आहेत की, कशासाठी याचे उत्तर आता मनपा प्रशासन अधिकाऱ्यांनी द्यावे! कारण जनतेच्या टॅक्स मधून या कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा पगार निघतो. मग सामान्य माणसांना यांना फोन करण्याचा अधिकार नाही का? असा प्रश्न आता सामान्य नागरिकांना भेडसावत आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेत आयुक्त अकुनुरी नरेश यांनी या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन जनतेला योग्य पाणीपुरवठा व्हावा तसेच अशा निष्क्रिय सुपरवायझरवर योग्य ती कारवाई करावी अशी आता नागरिकाकडूनच मागणी होत आहे. असे उद्धट, आणि उर्मट वागणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेडीच तंबी द्यावी अशी मागणीही होत आहे.
येणाऱ्या पुढील महिन्यात, वाढता उन्हाचे चटके पाहता, नागरिकांना योग्य पाणीपुरवठा व्हावा, हीच मनपाला सदिच्छा!