नंदगुर येथे वन विभागाच्या जागेवर झालेल्या बांधकामावर कारवाई ! वन विभागाकडून मलमपट्टी की मूक सहमती!
वन विभागाच्या जागेवर शिवयात्रेची रजत तयारी !
दिनचर्या न्यूज:-
चंद्रपूर :-
चंद्रपूर तालुक्यातील पिंपळखुट साजा येथील अंधारी नदीला लागून असलेल्या गोनठाणा नंदगुर येथील सर्वे नंबर 16 आराजी 7.02 अशा वन विभागाच्या 17 एकर जागेमध्ये दिनांक 15 व16 तारखेला शिव मंदिराची स्थापना होणार असल्याची परिसरातील गावा गावात चर्चा होत आहे.
वन विभागाच्या जागेतील शेकडो वृक्षाची कटाई करून
त्या ठिकाणी शिव यात्रा कार्यक्रम करण्यासाठी झाडाच्या बुंद्याजवळ ओटे बनवण्यात आले.
ही वन विभागाची जागा गावकऱ्यांना सामूहिक वन हक्क दावा म्हणून वन विभागाकडून देण्यात आली. या मागचा उद्देश असा की निसर्ग पूरक वातावरण व त्या गावासाठी विद्यार्थी, तरुण व गावाचा विकसित विकास व्हावा या उद्देशाने ही जागा ग्रामपंचायत कडे विकासाच्या दृष्टिकोनातून देण्यात आली असल्याचे सांगण्यात येथे. डीएपो राजन तलमले साहेब म्हणतात तिथे झालेले बांधकाम अनअवधाने, (चुकीने)झाल्याचे सांगतात. परंतु या संदर्भात परिसरातील गावातील नागरिक म्हणतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात साग वृक्ष सारख्या झाडाची कथल , जुळपी जंगल व त्या ठिकाणी असलेले अनेक झाडांची कत्तल झाली हे वन विभागाला माहिती दिल्यावर कळते का? हा प्रश्न मात्र अनुत्तीत आहे. की या प्रकरणावर वनविभाग सावरासावर करीत असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
त्या ठिकाणी बांधण्यात आलेले ओटे, जेसीबी च्या माध्यमातून तोडण्याची प्रक्रिया वन विभागातून करण्यात आली. लगतच या जागेवर यात्रा झाल्यावर ग्रामपंचायत च्या माध्यमातून एम आर जी एस मार्फत वृक्ष लागवड करण्यात येईल असे वन विभागाकडून सांगण्यात येते.
संबंधित वन विभागाचे कडे कडक कायदे असताना या ठिकाणी मात्र वन विभागाने डोळ्यावर पट्टी बांधली की काय? असा प्रश्न आता गावकऱ्यांकडून केला जात आहे.
या जागेत पहिले वन विभागाची रोपवाटिका असल्याचे बोलले जाते. संबंधित जागेबाबत महसूल विभागाला विचारणा केली असता. ही जागा वन विभागाच्या नावावर असून सरकार(वनविभाग) सर्वे नंबर 16, आराजी 7.02 अशा 17 एकर मध्ये वन विभागाच्या नावावर असल्याचे सांगितले. महसूल विभागाची ही जागा नसून वन विभागाच्या अधिकार क्षेत्रात असल्याचे सांगितले गेले.
येथील वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती म्हैसेकर यांना माहिती होताच आपल्या कर्मचाऱ्यासह संबंधित जागेवर जाऊन होत असलेल्या बांधकामास तोडण्याचे निर्देश दिले. सामूहिक वन हक्क दावा जागेवर कुठलेही बांधकाम करण्यात येऊ नये, ते गैर कानूनी आहे. असा समज गावकऱ्यांना दिला. कुठल्याही परिस्थितीत होणारी यात्रा थांबणार नाही. पण वन विभागाच्या परवानगीशिवाय कुठलेही काम करू नये अन्यथा ते बेकायदेशीर असेल असा समजही गावकऱ्यांना दिला. महाशिवरात्रीची यात्रा झाल्यानंतर वन विभाग कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
