विकसित भारताच्या पायाभरणीचा आणि सर्वसमावेशक विकासाचा अर्थसंकल्प - हंसराज अहीर




विकसित भारताच्या पायाभरणीचा आणि सर्वसमावेशक विकासाचा अर्थसंकल्प - हंसराज अहीर
दिनचर्या न्युज :-.
चंद्रपूर :-
चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वातील सरकारचा नववा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारमण यांनी संसदेत सादर केला असून हा अर्थसंकल्प 2047 मधील विकसित भारताची ‘ब्ल्यू प्रिंट’ असून हा अर्थसंकल्प गरीब, युवाशक्ती, शेतकरी, महिलाशक्ती व मागासवर्गीय घटकांना समर्पित, ऐतिहासिक व देशाच्या विकासाला नव्या उंचीवर नेणारा असल्याचे पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे पुर्व अध्यक्ष हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.
या अर्थसंकल्पात शेती, उद्योग, स्टार्टअप, शिक्षण, आरोग्य, स्वंयरोजगार व रोजगारासह अन्य महत्वूपर्ण क्षेत्रात पायाभुत सुविधांना दृष्टीपथात ठेवून देशाच्या विकासाला भरीव आर्थिक तरतुदीतून नवी दिशा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.
इलेक्ट्रनिक पार्ट्स उत्पादनासाठी रू. 40 हजार कोटीची तरतुद, लघु उद्योगासाठी रू. 2 हजार कोटीची तरतुद, नोकरदार करदात्यांना रू. 12.75 लाखावर आयकर मुक्ती, कॅन्सर, मधुमेह व अन्य दुर्धर आजारावरील औषधोपचार स्वस्त, मच्छिमारांना दिलासा, भारताला मेडिकल टुरिझम केंद्र बनविण्यात येणार, देशात 5 ठिकाणी मेडिकल हब, औषध निर्मिती हब, 3 नवीन आयुर्वेदीक कॉलेज, बायोफार्मासाठी रू. 10 हजार कोटीची तरतुद, पशुवैद्यकीय व दुग्ध व्यवसायासाठी विशेष तरतुद, वस्त्रोद्योग, हातमाग व हस्तकला उद्योगांना चालना, हातमाग व्यवसायाला चालना देण्यासाठी महात्मा गांधी ग्रामस्वराज अभियान, मेगा टेक्सटाईल केंद्रांची उभारणी, 3 केमिकल पार्कची उभारणी, नवीन क्रीडा संकुले, सांस्कृतिक केंद्राची उभारणी, राष्ट्रीय हॉस्पीटॅलिटी सेंटरची स्थापना, सीएनजी, बायोगॅस, सौरउर्जा संबंधी उपकरणे, कापड, भारतात बनवलेले कपडे, क्रीडा साहित्य स्वस्त होणार अशा अनेक लोकाभिमुख, विकासाभिमुख योजना कार्यान्वित करून देशाला समृध्द व विकसित राष्ट्राकडे नेणारा हा अर्थसंकल्प असल्याचे हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.