इंडियन गॅसच्या दरवाढीमुळे सामान्याची चूल महागली !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
बाहेरील देशाच्या युद्धाची झळ भारताला बसत आहे. अचानक काल इंडियन गॅस घरगुती वापरात असलेल्या गॅस सिलेंडरची ६० रुपयांनी वाढ केली तर व्यवसायात असलेल्या गॅस सिलेंडरवर १६३ रुपयांनी वाढ झाल्याने सर्वसामान्य कुटुंबावर, व्यवसायावर आर्थिक संकटाचा बोजा पडला आहे. या गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या कुटुंबाचे कंबर्डे मोडणार आहेत. देशात महागाईचा भस्मासुर पहिलेच गगनाला पोहोचला आहे. अशातच सर्वसामान्य माणसांना, व व्यावसायिक गॅस वापर करणाऱ्यांना याचा मोठी झळ बसणार आहे. थेट युद्धाचा परिणाम या गॅस वाढीवर झाल्याचे बोलले जात आहे. मात्र या महागाईच्या दरवाढीमुळे सामान्याची चूल मात्र आता महागली असून येणाऱ्या काही काळात पुन्हा याची कळा सामान्याला सोसावी लागेल की काय असा प्रश्न मात्र आता सामान्य जनतेत होत आहे.
एवढेच नाही तर डिलिव्हरी करणारे एजन्सी चे कर्मचारी घरोघरी पोहोचविण्याचे वेगळे चार्ज ग्राहकांकडून वसूल करतात.
एकीकडे सरकार इकडे योजनेचे लॉलीपॉप देत आहे. तिकडे मात्र इंधन वाढ,पेट्रोल वाढ करून गोर गरिबाचे कंबरडे मोडले आहे. या वाढीमुळे सामान्य माणसाचा नाराजीचा रोष मात्र सरकारवर होत आहे.
