लोहारडोंगरी' लोह खाण प्रकल्पाची परवानगी रद्द करा, बंडू धोत्रे यांच्या अन्नत्याग उपोषणाला पर्यावरण संवर्धन व विकास समितीचा पाठिंबा, जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन




लोहारडोंगरी' लोह खाण प्रकल्पाची परवानगी रद्द करा,
बंडू धोत्रे यांच्या अन्नत्याग उपोषणाला पर्यावरण संवर्धन व विकास समितीचा पाठिंबा, जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात प्रस्तावित लोहार डोंगरी लोहखान प्रकल्प तात्काळ परवानगी रद्द करणे तसेच व्याघ्र अधिवासातील ताडोबाच्या महत्वपुर्ण भ्रमणमार्गावरील लोहखान ब्लॅक प्रस्तावीत रद्द करावी यासाठी इको प्रो चे संस्थापक अध्यक्ष बंडू धोत्रे अन्य 16 मागण्यासह दिनांक ५/३/२०२६ पासुन सात दिवस होऊनही अन्य त्याग आंदोलन सुरू आहे. त्यांच्या
उपोषणाला पर्यावरण संवर्धन व विकास समितीचा पाठिंबा देऊन, जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन त्यात आले . यावेळेस डी. के. आरिकर , हरीश ससनकर, डॉ देव कन्नाके प्रा माधव गुरनुले, अरूण धानोरकर, मनोहर रासपायले उमाकांत धांडे, रितू पाटील, विद्या बांबोळे अतुल ठाकरे, सुधीर कोरडे, दिनेश एकवणकर त्यांची उपस्थिती होती.
चंद्रपूर जिल्हयातील ब्रम्हपुरी तालुक्यात प्रस्तावित लोहारडोंगरी लोहखाण प्रकल्पामुळे वाघ व अन्य वन्य प्राण्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होण्याची व त्यामुळे मानव वन्यजिव संघर्ष वाढून वाघाचे अस्तित्वच संपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत, ही खाण झाल्यास परिसरातील ३६ हेक्टर राखीव वनक्षेत्र संपुष्टात येईल, १८ हजारावर मोठी व लाखो लहान झाडे नष्ट होतील, हजारो जंगली प्राणी स्थलांतर करतील, हा परिसर म्हणजे घोडाझरी अभयारण्य व ताडोबा अभयारण्य या दोन्ही अभयारण्याला जोडणारी मार्गीका आहे त्यामुळे प्राण्यांच्या हालचालीवर निर्बंध येवून ते मानवी वस्तीकडे स्थलांतर करण्याची व त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष अधिक तिव्र होण्याची शक्यता आहे याच कारणामुळे चंद्रपूर येथील पर्यावरणप्रेमी श्री. बंडू धोतरे यांचे विषयांकीत व अन्य १७ मागण्यांना घेवून चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.५ मार्च २०२६ पासुन अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. सदर आंदोलनाला पर्यावरण संवर्धन व विकास समिती महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने सक्रीय समर्थन जाहिर करण्यात आले.
सदर विषय हा पर्यावरण संतूलन व वन्यजीव आणि चंद्रपूर जिल्हयातील नागरीकांच्या जिवित्वाशी संबंधित असल्यामुळे आपण या अन्नत्याग आंदोलनाची तात्काळ दखल घेवून सर्व मागण्या तात्काळ सोडवून अन्नत्याग आंदोलन अधि गंभीर रूप घेण्यापुर्वी सोडवावे. अशी मागणी या निवेदनामार्फत करण्यात आली.