गटबाजीची धगधग मनपा स्थायी समितीतही दिसली, दोन्ही पक्षाच्या सदस्याच्या नावावरून गदारोळ !



गटबाजीची धगधग मनपा स्थायी समितीतही दिसली, दोन्ही पक्षाच्या सदस्याच्या नावावरून गदारोळ !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर महानगरपालिकेतील १६ स्थायी समिती सदस्यांची निवडणीसाठी मनपा सभागृहात 5 मार्च रोजी विशेष सभा घेण्यात आली. मात्र सत्तारूढ भाजप आणि विरोधी बाकावर असलेले काँग्रेसच्या दोन्ही गटात गटबाजीची धगधग थांबता थांबेना ! असे चित्र आज सभागृहात दिसले. त्यामुळे काही काळ सभागृहात गदारोळ झाला . काही सदस्यांनी वाक आउट केले. काँग्रेस पक्षाचे मनपा गट नेते राजेश अडुर यांनी बंद लिफाफा पीठासन अधिकारी महापौर संगीता खांडेकर यांच्याकडे सोपविला, त्यात स्थायी समिती साठीसमिती काँग्रेसचे सदस्य म्हणून वसंत देशमुख,सचिन कात्याल,राजेश अडूर ,संजीवनी वासेकर,चंदा वैरागडे,सोफिया तवंगर,विनोद लभाने यांची नावे निघाली. मात्र राष्ट्रीय अध्यक्षाने खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटातील तीन नावे संगीता अमृतकर, संगीता भोयर, राहुल घोटेकर यांची नावे पाठविण्यात आली होती. परंतु हेतू पुरस्ककर, जाणून - बुजून गट नेत्याने नावे कापल्याचा आरोप संगीता अमृतकर यांनी केला असून या संदर्भाची शहर जिल्हा अध्यक्ष संतोष लहामगे यांनी आक्रमक मागणी करीत अडूर यांच्या गच्छंतीची मागणी केली आहे. प्रदेशाध्यक्षाच्या भ्रमणध्वनीला केराची टोपली दाखवल्याने काँग्रेसमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. सभागृहातून पाच-सात सदस्य सोडले तर काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी नाव पसंद न आल्याने वाकआउट केल्याचे दिसून आले.
तसेच मनपात सत्ता असलेल्या भाजपकडून स्थायी समितीच्या सदस्यासाठी सुभाष कासनगोटूवार,
संजय कंचर्लावार, प्रज्वलंत कडू ,सारिका संदुरकर,सविता सरकार ,पुष्पा उराडे त्यांची नावाची यादी देण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाकडून
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)मनस्वी गिन्हे ,श्रुती घटे यांची नावे देण्यात आली. मात्र आम्हाला विश्वासात न घेतल्याचा आरोप नगरसेवक रवी लोणकर यांनी केला. आपल्या मर्जीतील सदस्यांना सदस्यत्व दिल्याने जाहीर नाराजी व्यक्त केली.जनविकास सेनेकडून प्रदीप देशमुख यांना सदस्य देण्यात आले.
चंद्रपूर महानगरपालिकेत महापौर पदापासून तर आतापर्यंत  स्थायी समिती सदस्याच्या निवडणुकीपर्यंत मतभेद , गटबाजीचे वादळ थांबता थांबेना. सत्ता गमवणाऱ्या काँग्रेसमधील गटबाजी कमी होण्याऐवजी वाढत चालल्याचे चित्र आज मनपा स्थायी समिती सदस्य निवडणुकीत दिसून आली.
  काँग्रेसच्या सदस्य निवडीत  गटाचे विजय वडेट्टीवार गटाचे
 सर्व सातही सदस्य असल्याने खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाचे नगरसेवक नाराज झाल्याचे चित्र दिसून आले. 
महापौरांची निवडणूक झाल्यानंतर तत्काळ स्थायी समितीची निवड प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, एक महिना उलटूनही ही निवड न झाल्याने नगरसेवकांमध्ये मोठा असंतोष होता. काँग्रेससह सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी महापौरांची भेट घेत स्थायी समिती निवडणुकीबाबत तत्काळ निर्णय घेण्याची आक्रमक मागणी केली होती. त्यानंतर गुरुवारी विशेष सभा घेत स्थायी समिती सदस्यांच्या नावावर अंतिम निर्णय घेण्यात आला. यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सात, भारतीय जनता पक्षाचे सहा, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दोन व काँग्रेसचा मित्रपक्ष जनविकास सेनेचा एक असे एकूण सोळा सदस्य या स्थायी समितीत असणार आहेत. मात्र काँग्रेसच्या सदस्यांमध्ये सर्व नगरसेवक हे वडेट्टीवार गटाचे आहेत. त्यामुळे खासदार धानोरकर  गटाच्या नगरसेवकांना मोठा धक्का बसला.
त्यामुळे स्थायी समिती सभापती निवडीच्या वेळी खासदार धानोरकर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मित्रपक्ष जनविकास सेनेचा एक सदस्य हा धानोरकर यांच्या विश्वासातील मानला जातो.
 मात्र काँग्रेस शहराध्यक्ष  संतोष लहामगे यांनी  पत्रकार परिषद घेत  पक्षश्रेष्ठीकडे कारवाई करण्याची मागणी  केली  व तात्काळ गटनेते पदावरून राजेश अडूळ यांची हक्कलपट्टी करण्याची मागणी त्यांनी पत्रकार परिषदेतून केली.