ट्राफिक पोलिसांनी जबरदस्तीने वसुली करू नये- परिवहन मंत्री
मात्र चंद्रपूर वाहतूक विभागाकडून नियमाला बगल !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महाराष्ट्र सरकारच्या परिवहन मंत्र्याने स्पष्ट आदेश जाहीर केले .महाराष्ट्रातील ट्राफिक पोलिसांनी जबरदस्ती वसुली करू नये असे आदेश महाराष्ट्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्र ट्राफिक पोलीस विभागाला दिल्याचे परिपत्रक समोर येत आहे? वाहन चालकावर आता बळजबरी होणार नाही. स्पष्ट निर्देश जाहीर केले आहेत. ई /चालन व दंड वसुलीसाठी वाहन चालकावर जबरदस्ती केल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्याने नागरिकांमध्ये नाराजीची सूर समोर येत आहे. त्यामुळे अप्पर पोलीस महासंचालकाने आदेशजाहीर केले आहेत. त्यामुळे या परिपत्रकानुसार ट्राफिक पोलिसांनी जबरदस्तीने इ चलन किंवा दंड घाईघाईत वसूल केल्यास किंवा कोणत्याही प्रकारची अवैध्य पैशाची मागणी तसेच दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असे निर्देश जाहीर केले. या निर्णयामुळे ट्राफिक पोलीस व वाहन चालकातील सुधारण्यास मदत होईल असे म्हटले गेले आहे. तसेच यामुळे धन वसुलीला कायदेशीर चालना मिळणार आहे. चालन व दंड भरणे आवश्यक असले तरी चुकीच्या पद्धतीने वसूल करणे यावर पोलीस विभागाचे लक्ष राहणार आहे.
या सर्व नियमाला बगल देत चंद्रपूर वाहतूक विभागाकडून
सर्रास ट्राफिक पोलिसांना वसुलीचे टार्गेट म्हणजेच पर ट्राफिक पोलिसांना दर दिवसाला दहा इ चलन तसेच पेट्रोलिंग वर असलेल्या गाडीला दर दिवसाला ... वसुलीचा अधिकाऱ्याकडून जबरदस्तीने टार्गेट ठरवून दिला गेले आहे. चंद्रपूर वाहतूक विभागाकडून चंद्रपूर शहराची वाहतूक खिळखिळी झाली. तरी मात्र संबंधित अधिकाऱ्यांची साडेचार वर्षाच्या वर्त झाले असले तरी, या विभागातून मक्तेदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने समता संपेल ना? यासाठी जबरदस्तीने इ चलन व दंड वसूल करण्यासाठी अधिकाऱ्याने आपल्या मर्जीतील दोन वाहतूक हवालदाराची नियुक्ती केली असल्याचे विभागातूनच बोलले जाते.
