मंत्री पंकजा मुंडे यांनी हनुमान खिडकी झरपट नदीपात्राची केली पाहणी



मंत्री पंकजा मुंडे यांनी हनुमान खिडकी झरपट नदीपात्राची केली पाहणी


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-

चंद्रपूर शहरातील जीवनदायिनी असलेल्या झरपट नदीची अत्यंत दयनीय अवस्था आहे. या नदीत अत्यंत घाण रहीत सांडपाणी सदैव वाहत असते. या नदीपात्राची रुंदी आता नाल्याच्या स्वरूपात झाली आहे. या नदीपात्राचे फार मोठे इतिहास आहे. या झटपटनदीत महाकाली यात्रेत येणाऱ्या भाविक मोठ्या आस्थेने स्नान करतात. परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची चांगली व्यवस्था या नदीपात्रात मिळाली नाही.
मात्र चंद्रपूर जिल्ह्याचे माजी मंत्री, विकास पुरुष ,आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यावरणासंदर्भात समस्या मांडल्यात. आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी चंद्रपूरला येण्याचे आश्वासन दिले.

बिड जिल्हातील नाही तर आपल्या सासरच्या जिल्हातील भाविक महाकाली यात्रेत येत असतात. असा मिस्कील टोला लावला. 
 त्या संदर्भात त्या आज चंद्रपूर जिल्ह्याच्या दौरावर असताना भिवापूर वार्डाला लागून असलेल्या हनुमान खिडकी झरपट नदीपात्राला प्रत्यक्ष भेट दिली. त्यांनी या झरपट नदीच्या समस्या जाणून घेतल्या. आणि येणाऱ्या काळात या नदीचे सौंदर्यकरण करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी त्यांच्यासोबत आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, जिल्हा परिषद सिओ पुलकित सिंग, तहसीलदार विजय पवार, वार्डातील नगरसेवक वसंत देशमुख, नगरसेवक नंदू भाऊ नगरकर, नगरसेवक प्रज्वलंत कडू, या सह वार्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.