' मी' सांभाळतो चंद्रपूरची सुव्यवस्था? माझे वरदस्त वर ?पाच वर्षाच्या कालावधीतही चंद्रपूरची वाहतूक व्यवस्था... ?


' मी' सांभाळतो चंद्रपूरची सुव्यवस्था ? माझे वरदस्त वर ?.. पाच वर्षाच्या कालावधीतही चंद्रपूरची वाहतूक व्यवस्था... ?

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :-

चंद्रपूर वाहतूक पोलीस निरीक्षक शाखेत मागील जवळपास पाच वर्षापासून पोलीस निरीक्षक या पदावर पाटील यांची नियुक्ती आहे . प्रत्येक वाहतूक पोलिसांना ठरलेल्या पॉईंटवर नियुक्ती करण्यात येते. व्यवस्थेचे धडे न देता त्यांच्याकडून प्रत्येकी रोज दहा चालन करण्याचे आदेश प्रमुखांकडून आल्याचे सांगण्यात येते?
'मी' मागील पाच वर्षापासून चंद्रपूरची माणिकपणे सुव्यवस्था सुरळीत करीत आहे? मात्र यातही चंद्रपूर शहरातील अपघाताचे प्रमाण जवळपास कमी होण्याचे नावच दिसत नाही! मग या अपघाताला जबाबदार कोण?
कारण माझे वरदस्त वर? त्यातही राजकीय हस्तींचा, आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठबळ! यात मी परिपूर्ण जवळपास पाच वर्षाचा कालावधी पूर्ण केल्याच्या नंतरही चंद्रपूरची सुव्यवस्था करण्यात मला आनंद मिळत आहे?
वर्षभर चंद्रपूर शहरातील मुख्य रस्त्यावर नो पार्किंग च्या जागी ट्रॅव्हल्स उभ्या करून वाहतुकीला अडथळा करीत करीत असताना सुद्धा व्यवस्था सुरळीत करीत आहे?
मागील काही महिन्यापासून चंद्रपूर शहरातील पडोली येथील पुलावर एका दाम्पत्याचा जीव गेला. तेही पोलीस वाहनाच्या वाहनाने. एवढेच नाही तर काल रात्री निष्पाप दोन जीवाचे बळी गेले ? बंगाली चौकातही अनेकदा अपघातात लोकांचे जीव गेले.शहरात. रस्त्यावर वाहने बिनधास्त उभी केली जातात.
मग मी चंद्रपूरची सुव्यवस्था करीत आहे की नाही! यालाही दोष कोणाला द्यायचा! कारण' मी ' चंद्रपूरची सुव्यवस्था प्रखळ पणे राबवीत आहे. कारण मला वरिष्ठाचे आशीर्वाद आहेत?
चंद्रपूर शहरातील मोठ्या मोठ्या हॉटेलच्या समोर नो पार्किंग असताना, भर रस्त्यावर गाड्यांची राग लागते. वाहतुक करणाऱ्या वाहनांना जागाही राहत नाही. अशा ठिकाणी अपघात झाल्यास जबाबदार कोण? चंद्रपूरच्या बल्लारपूर रोड, मूल रोड, आणि मुख्य रस्ता असलेल्या नागपूर रोडवर दोन्ही बाजूला अवैध्य जळवाहानाची पार्किंग उभे असते, मग ही सुव्यवस्था नाही का?
चंद्रपूर शहरातील वाहतूक नियंत्रण कक्षाचे  पोलीस  सिग्नल वर  काय करतात तर! अधिकाऱ्यांनी  आम्हाला दिवसभरात दहा चालन करण्याचे फर्मान सोडले आहेत असे सांगतात! मग त्यात फक्त हेल्मेट वाले दिसतात का?
मग त्यात शहरात चालणाऱ्या चार चाकी  वहान,फार थोडे जिल्ह्या व्यतिरिक्त असलेले वहानच  चालन करण्याकरिता दिसतात का?  सिग्नल चालू असताना प्रामाणिकपणे नागरिक व्यवस्थित जात असतात. मात्र या ठिकाणी वाहतूक  पोलीस उपलब्ध असतात. मात्र ज्या ठिकाणी वरदडीचे आणि रस्त्यावरील  नो पार्किंगच्या ठिकाणी  धनधाडग्याचे वाहने उभे असतात त्या ठिकाणी मात्र वाहतूक निरीक्षक कारवाई करताना दिसत नाहीत.
वाहतुक शहरांमध्ये   असता-व्यस्त झाली आहे.
  तरीपण वाहतूक पोलीस निरीक्षकांची या ठिकाणाहून मोह माया संपताना दिसत नाही!

वाहतूक नियंत्रण कक्षात असलेल्या दोन नंबरच्या गाडीला हायवेवर पाठवल्या जाते. त्या गाडीकडून पर डे सूत्राच्या माहितीनुसार तीन हजार रुपये हे प्रमुखाकडे जमा करण्याचे खमके आदेश संबंधिताला असतात.

एवढेच नाही तर हायवेवर स्पीड नियंत्रणासाठी इंटरसेप्टर वाहन उपलब्ध असते. वेग प्रतिबंधक यंत्रणासाठी येणारे वहान किती स्पीडची असते त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोग असतो. परंतु वाहतूक विभागाच्या या गाडीचा उपयोग. तसं न करता संबंधित वाहनांना थांबवून त्या गाडीला तुमची चालन झाले आहे. एवढे चालन तुम्हाला आता भरावे लागतील, यासाठी दोन-तीन वाहतूक पोलीस मुख्य रस्त्यावर उभे राहतात. ही गाडी जर अर्धा किलोमीटर वरून इंटरसेप्टर वाहन चालन करत असेल तर, या वाहतूक पोलिसांचे काय काम?

संबंधित वाहन चालकांना प्रलोभन देऊन सर्रास त्या वाहनधारकांकडून दामाजी घेतल्या जात असल्याचा प्रकार चर्चिला जात आहे. मागील  जवळपास पाच वर्षांपासून वाहतूक पोलीस निरीक्षण या शाखेत पाटील साहेब यांच  पोलीस अधीक्षक यांच्या  आशीर्वादाने चांगलंच चांगभल होत आहे?  किंवा यांच्यावरही  वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही दबाव आहे का?

यापूर्वी वाहतूक शाखेतील निरीक्षक राहिलेल्या पदावर एवढे वर्ष कुठलाच वाहतूक पोलीस निरीक्षक  एकाच ठिकाणी राहिल्याचे दिसून आले नाहीत. पण पाटील साहेबांचे  जवळपास   पाच वर्षानंतरही या विभागातील

 नियुक्ती का? असा प्रश्न आता सामान्यतः  जनतेकडून विचारला जात आहे?
आता चंद्रपूर जिल्ह्याला नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक नोपानी साहेब मिळाले आहेत. हे तरी या गंभीर विषयावर दखल घेतील का याकडे  चंद्रपूरकरांचे लक्ष लागले आहेत.

वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक पाटील यांची तात्काळ बदली करण्यात यावी.नागपूर रोड, बंगाली कॅम्प रोड, तुकुम रोड, मगनया नाका व शहरातील सर्व मुख्य रस्ते अवैध पार्किंगमुक्त करण्यात यावेत.. संध्याकाळच्या वेळी नागपूर रोडवर विशेष वाहतूक पथक तैनात करण्यात यावे.

जनता कॉलेज चौकासह प्रमुख चौकांमध्ये दोन्ही दिशांना ट्रॅफिक पोलीस उभे करावेत.

अवैध पार्किंग करणाऱ्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करावी.

. एसटी बस व खाजगी ट्रॅव्हल्सना चौकात थांबण्यास मनाई करावी.

मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही व स्पीड सेन्सर बसवण्यात यावेत.