बुद्ध पौर्णिमेच्या रात्री वन्य प्राण्यांची मचाण गणना ; निसर्गप्रेमी,पत्रकार रात्रभर बनले निसर्गाचेसाक्षीदार !




बुद्ध पौर्णिमेच्या रात्री वन्य प्राण्यांची मचाण गणना ; निसर्गप्रेमी,पत्रकार रात्रभर बनले निसर्गाचेसाक्षीदार !

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :-

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात दिनांक १ मे २०२६ रोजी
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने चंद्राच्या लख्ख प्रकाशात , दूधासारख्या चांदण्यात न्हालेल्या जंगलात शांततेचा एक वेगळाच स्वर उमटला. आणि त्या शांततेतून सुरू होती वन्यजीवांच्या हालचालींची नोंद.
जलाशयांवरील मचाण गणनेत निसर्गप्रेमी, पत्रकार मंत्रमुग्ध होऊन रात्रभर बनले निसर्गाचे साक्षीदार ;
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जलाशयांवरील वार्षिक मचाण गणना यशस्वीरित्या पार पडली. उन्हाळ्याच्या तीव्र कालावधीत वन्यप्राणी पाणवठ्यां भोवती एकत्र येतात, त्यावेळी त्यांच्या उपस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण मोहीम राबविण्यात आली. निसर्गाने आपला चमत्कार करील थोड्या वेळासाठी ढगाळ वातावरणात वाऱ्याची झुरळ,पावसाची बुंदा- बुंदी सुरू झाली होती. त्यावेळेस जंगलातील जमिनीतून निघणारा सुगंध मंत्रमुग्ध करणारा होता. प्राणी जनगणेत ढगाळ वातावरणामुळे थोडा कोळंबा झाला. काही पानवट्यावरील मचानावर प्राण्यांनी पाठ फिरवली. तरी मचानावरील रात्रीचा तो किड्यांचा कर्कस आवाज , पक्ष्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज,पानांची सळसळ, दूरवरून येणारे प्राण्यांचे आवाज, आणि अधूनमधून पाणवठ्यावर येणाऱ्या वन्यजीवांची चाहूल या साऱ्यांनी वातावरणात एक रोमांचक थरार निर्माण केला होता. मोर, जंगली कोंबडे,सायाळ, हरीण, चितळ, बिबट, रानडुक्कर, कोल्हे आणि लांडगे यांसारख्या प्राण्यांचे दर्शन अनेकांना झाले, तर विविध पक्ष्यांच्या हालचालींचीही नोंद घेण्यात आली.

ही गणना कोअर व बफर अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये पार पडली असून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांचाही उत्स्फूर्त सहभाग होता.
कोअर क्षेत्रात एकूण ९९ मचाण उभारण्यात आले होते आणि २०१ वनकर्मचारी निरीक्षणासाठी तैनात होते. बफर क्षेत्रात ६९ मचाण उभारण्क्षात आले, त्यापैकी ५४ मचाण ऑनलाइन प्रणालीद्वारे नोंदणीकृत होते, ज्यातून नागरिकांचा मोठा प्रतिसाद दिसून आला. बफर क्षेत्रात एकूण २१० सहभागी या उपक्रमात सहभागी झाले.
गणनेतील महत्त्वाचे निष्कर्ष
संकलित आकडेवारी आणि प्राथमिक विश्लेषणानुसार एकूण ५,७६५ वन्युप्राणी दर्शनांची नोंद करण्यात आली.
शाकाहारी प्राण्यांचे (खुरधारी) प्रमाण सर्वाधिक असून ३,०८९ दर्शन (५३.६%) नोंदविण्यात आले,
तसेच भारतीय मोरासह विविध पक्षांची नोंद झाली
ही आकडेवारी कोअर व बफर क्षेत्रांमध्ये संतुलित भक्ष्य-भक्षक साखळी असलेली सुदृढ परिसंस्था दर्शवते.
"या उपक्रमातून मिळालेली माहिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील दीर्घकालीन वन्नाजीव निरीक्षण, अधिवास व्यवस्थापन आणि संवर्धन नियोजनासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल."
कळक उन्हाळा असला तरी काही प्रमाणात नैसर्गिक पान वाट्यावर काही प्रमाणात पाणी साचले असल्याने वन्यप्राणी पाण्यासाठी बाहेर पडले नाहीत.

प्रत्येक मचानावर वन विभागाकडून प्रशिक्षित मार्गदर्शक आणि सुरक्षा रक्षक तैनात होते. ज्यामुळे हा उपक्रम सुरक्षित आणि शिस्तबद्ध पार पडला.

पर्यावरणाबद्दलची माहीती मिळते

वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली सहभागीना निसर्ग निरीक्षणाचे मूलभूत नियम, वन्यजीवांचे वर्तन आणि संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. निसर्गात शांतपणे बसून निरीक्षण केल्याने संयम, संवेदनशीलता आणि पर्यावरणाबद्दलची जाणीव वाढते, अशी प्रतिक्रिया
वनपरिक्षेत्र अधिकारी सतोष थिपे यांनी दिली.
मचान गणनेमुळे वन्यप्राण्यांची संख्या, त्यांच्या हालचाली आणि सवयींचा अभ्यास करण्यास मदत होते. ही माहिती वन्यजीव संवर्धनासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.



आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव



एडवोकेट आशिष कडूकर मनाले, रात्री चंद्राच्या प्रकाशात एक वेगळाच आनंद मिळाला. फक्त वाघ दिसणे हा हेतू नव्हता. त्यात वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव पाहायला मिळाले. एक एक मिनिटाला वेगवेगळ्या आवाज रात्रभर कानावर पडत होते. थंड वातावरणात या
निसर्गाच्या सान्निध्यात घालवलेली ही रात्र आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव ठरेल!



डॉ.डी.डी.कडुकर निवृत्त,  पशू  वैद्यकीय अधिकारी,
यापूर्वी  ताडोबात वाईल्ड लाईफ चे काम केले आहे. हा दुसरा अनुभव होता. निसर्गाशी पुन्हा एकदा नातं जोडण्याची संधी  मिळाली.
मंचावरून प्राणी गणनेत चंद्राच्या प्रकाशात  वेगळाच आनंद घ्यायला मिळाला. वेग वेगळ्या पक्षांचा आवाज येत होता. प्रत्येक पक्षी एकमेकांशी वार्तालाप करत होते. त्यामुळे रात्रभर खूप चांगला अनुभव आला.