पोलीस अधीक्षकांची भूमिका स्पष्ट डीजेवरील बंदी कायम, मग त्या अटी शर्तीचे काय ?
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
येणाऱ्या गणेशोत्सवास कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने डीजेवर घातलेली बंदी कायम ठेवली आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार निर्धारित डेसिबलच्या मर्यादित ध्वनी यंत्रणेवर परवानगी असेल, असे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांची स्पष्ट भूमिका सांगितली.
मात्र चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी गणेश मंडळ, गणेश भक्त आणि डीजे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन अटी व शर्तीवर डीजेला परवानगी घेतली.
त्यांच्या मध्यस्थीनंतर अटी व शर्तीचे पालन करण्याच्या अटीवर यंदा गणेशोत्सवास मर्यादित आवाजात डीजे वाजवण्याच्या पोलीस विभागाने परवानगी दिली आहे. असे प्रसिद्धी पत्र काढले. त्यामुळे जिल्ह्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
यापूर्वी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी गणेश मंडळाची, व डीजे मालकांची बैठक घेऊन गणेशोत्सवात डीजेवर बंदी घातल्याचे आदेश दिले होते. आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट घेऊन या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली. चर्चा करून मोठ्या साऊंड सिस्टिम विना मर्यादित आवाजात डीजे वाजवण्यास परवानगी दिली जाईल. असे गणेश उत्सव मंडळांना तसेच डीजे धारकांना सांगण्यात आले. त्यासाठी गणेश मंडळ व डीजे मालकांना स्वयंघोषणापत्र सादर करणे अनिवार्य असेल, असे स्पष्ट सांगण्यात आले. असले तरी,
चंद्रपूरकरांना आता असा प्रश्न पडला आहे की, खरंच डीजे 50 डेसिबल च्या मर्यादेत वाजू शकतात का?
सर्वोच्च न्यायालयाने नियमानुसार निर्धारित केलेल्या डेसिबलच्या मर्यादेत डीजे वाजू शकतो का?
पोलीस प्रशासन ठरविलेल्या डेसिबलच्या मर्यादेच्या पलीकडे आवाज वाढल्यास खरेच कारवाई होईल काय?
डीजे मध्ये नशा पाणी करून नाचणाऱ्या तरुणावर पोलीस प्रशासनाने कारवाईचा बळगा उगारलास,तर राजकीय वरदस्त असलेल्या मंडळावर कारवाई होईल काय? अटी व शर्तीचे पालन डीजे धरका करून घेतिल काय? या सर्व प्रश्नाचे उत्तर अनुतरित आहेत?
चंद्रपूरात गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दरवर्षी विसर्जन मिरवणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता डीजे धारकाकडून, ध्वनी प्रदूषण, मिरवणुकीत डीजे वरून झालेले वाद, आणि यापूर्वी झालेल्या अनुचित घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून पोलीस विभागाने मिरवणुकीमध्ये डीजेवरबंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.
तो सर्वसामान्य जनतेला पटण्यासारखा होता. कारण डीजेच्या ध्वनी प्रदूषणामुळे, छोट्या बालकांना, रुग्णांना, वयोवृद्धांना, या आवाजाचा मोठा फटका सहन करावा लागतो. सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेली डेसिबल मर्यादे बाहेर ध्वनी यंत्रणा वाजवल्याशिवाय डीजे वाजत नसल्याचे जानकाराचे मत आहे. मग या अटी शर्तीचे काय?
