बाजार समितीने केला शेतकऱ्यांचा सत्कार

मुल/प्रतिनिधी:
विक्रीसाठी प्रथम आणणाऱ्या  शेतकऱ्यांचा समितीचे सभापती घनश्याम येनुरकर यांचे हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी उपसभापती संदीप कारमवार, संचालक संजय मारकवार,राकेश रत्नावार, शांताराम कामडे, राजेंद्र कन्नमवार, अखिल गांगरेड्डीवार, किशोर घडसे, मारोती चिताडे, रमेश गोयल, बाजार समितीचे सचिव चतुर मोहूर्ले यांची  उपस्थिती होती. मूल बाजार समिती शेतकऱ्यांच्या हिताचे कार्य करीत असून अधिक भाव मिळविण्याकरीता शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजार समीतीमध्येच आणावा असे आवाहन सभापती येनुरकर यांनी या प्रसंगी केले.