💥 बाॅम्बस्फोटात 4 ते 5 ठार; 11 जखमी

🔴  पुलगावच्या लष्करी तळाजवळील घटना_

♨ खासदार रामदास तङस यांनी दिली भेट


पुलगाव/प्रतिनिधी
देवळी तालुक्यातील सोनगावबाई गावाजवळ बॉम्ब निकामी करण्याच्या ठिकाणी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास बॉम्ब निकामी करताना पेटी हातातून पडल्यामुळे हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याच्या बातमीला नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. तर 11 जण जखमी झाले आहेत. जखमींवर सावंगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या स्फोटाच्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जबलपूर येथील दारुगोळा भांडारातील माल येथे निकामी करण्यासाठी आणले होते. स्फोटकं निकामी करण्याचे काम कंत्राटदाराकडून करुन घेतले जाते. त्यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असावी, अशी शक्यता वर्तवली जाते आहे.

खासदार भेट
पुलगाव येथे आग लागून दुर्घटना झाल्याने मोठे नुकसान झाले आहे, आज घटनास्थळी जाऊन संपूर्ण घटनेची प्रत्यक्ष माहिती घेतली व दुर्घटनाग्रस्तांची भेट घेऊन खासदार रामदास तङस यांनी सांत्वन केले.
#वर्धा जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री संजय दैने यांना तातडीने उपाययोजना करण्याकरिता सूचना दिल्या.

सविस्तर बातमी▪ http://khabarbat.in/wardha/