चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील लेखकांना आवाहन

चंद्रपूर/प्रतिनिधी:

 चंद्रपूरातील सूर्यांश साहित्य आणि सांस्कृतिक मंच चंद्रपूर तर्फे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सहयोगाने दिनांक 22 आणि 23 डिसेंबर 2018 ला राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन चंद्रपूर येथील मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मवीर कन्नमवार सभागृहात करण्यात आलेले आहे. ज्येष्ठ साहित्यिक आणि 85 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असून महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी, वात्रटिकाकार आणि चित्रपट निर्माता- दिग्दर्शक रामदास फुटाणे या साहित्य संमेलनाचे उद्घाटन करणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील 150 च्या आसपास साहित्यिक सहभागी होणार असून उदघाटनसह तीन विषयांवर चर्चासत्र, निमंत्रितांचे दोन कविसंमेलन, कथाकथन, रामदास फुटाणे यांची प्रकट मुलाखत, पुस्तक प्रकाशन, आणि सांस्कृतिक कार्यक्रमासह अन्य कार्यक्रम होतील. या संमेलनात चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील लेखकांना त्यांच्या प्रकाशित पुस्तकांची प्रसिद्धी करता यावी, त्यांच्या पुस्तकांची माहिती रसिकांपर्यंत पोहोचवतात यावी यासाठी या संमेलनात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील साहित्यिकांच्या पुस्तकाचे प्रदर्शन आणि विक्री संमेलनस्थळी करण्यात येणार आहे. तरी ज्या साहित्यिकांना आपल्या पुस्तकाच्या प्रति संमेलनस्थळी ठेवायच्या असतील त्यांनी अधिक माहितीकरिता दिनांक 10 डिसेंम्बर 2018 पर्यंत संस्थेचे अध्यक्ष आणि संमेलनाचे कार्याध्यक्ष इरफान शेख यांच्याशी 9665413821  या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.