शासनाच्या योजनेचा लाभ गरजूंनी घ्यावा:अहीर

चंद्रपूर/प्रतिनिधी:
प्रधानमंत्राी उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत कोरपना तालुक्यातील नांदगांव येथे दि. 1 नोव्हेंबर रोजी प्रधानमंत्राी एल.पी.जी. पंचायतीचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात केंद्रीय गृह राज्यमंत्राी ना. हंसराज अहीर, राजुराचे आमदार अॅड. संजय धोटे, दिशा समिती सदस्य खुशाल बोंडे, वाघुजी गेडाम, संचालय बिरला मंूडा इंडेन गॅस एजन्सी, राजुरा, श्री. मिस्कील, जिल्हा पुरवठा अधिकारी, नुतन जिवने, पं.स. सदस्य, कोरपना, विजय सातदिवे, डी.जी.एम.नागपूर, अरविंद कुमार, एलपीजी सेल, वंदना बेरड, सरपंच, नांदगांव, नरेश सातपुते, सरपंच, कवठाळा यांचे हस्ते गोवरी, पोवनी साखरी (वा.), वरोडा, पेल्लोरा, मारडा, नांदगांव, कवठाळा, कोलगांव, निंबाळा, गाडेगांव, बोरगांव या ग्रामीण भागातील 63 महिला लाभाथ्र्यांना इंडेन गॅसचे वाटप करण्यात आले. 
या प्रसंगी ना. अहीर यांनी शासनाच्या विविध लोकाभिमुख योजना ज्यामध्ये प्रामुख्याने आयुष्यमान भारत तसेच प्रधान मंत्राी आवास (ग्रामीण) व शासनाच्या उत्तम धोरणामुळे शेतमालाला खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळत असल्याचा आवर्जुन उल्लेख केला. अंबुजा प्रकल्पातील नांदगांव, कवठाळा परिसरातील अधिग्रहीत जमीनीला हक्काचा भाव मिळवून देण्याचा उल्लेख केला. आमदार अॅड. संजय धोटे यांनी परिसरातील वरोडा, कवठाळा सबस्टेशनच्या कामाचा उल्लेख करीत गडचांदूर, भोयगांव रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले. 
कार्यक्रमाला परिसरातील शेकडो महिला व पुरूष नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग होता. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृष्णा गेडाम, अॅड. प्रशांत घरोटे, वैभव जमदाडे, संजय चैधरी, सुदर्शन बोबडे, संदीप कावळे, संजय कोहपरे, दिलीप येलमुले, लक्ष्मण थेरे, संतोष भोयर, गणेश खोकले, स्नेहल बोबडे, श्री. राखुंडे, आशिष वानखेडे, श्री. मडावी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन अॅड. प्रशांत घरोटे यांनी तर आभार प्रदर्शन वसीम खान यांनी केले.