चंद्रपूरात घेण्यात आली फटाक्यांची चाचणी

चंद्रपूर/प्रतिनिधी:

चंद्रपुरात एसीपीबी मार्फत दिवाळी दरम्यान फोडले जाणाऱ्या फटाक्यांची चाचणी घेण्यात आली.फटाके ध्वनिप्रदूषणाची पातळी ओलांडत तर नाही हे पाहण्यासाठी चंद्रपूर येथे एम.पी.सी.बी च्या वतीने फटाक्यांची चाचणी घेण्यात आली.मुल रोड वरील MEL च्या ग्राउंड वर हि चाचणी घेण्यात आली. बाजारातून २७ प्रकारचे फटाके न सांगता विकत घेण्यात आले.व ते नॉईस टेस्टिंग मीटरच्या चार मीटर अंतरावर फोडण्यात आले. त्यातली सर्वात जास्त आवाजाचा फटका हा १२३ डीझीचा आढळून आला.