शिरपूर मुख्य रस्त्यावर पोलिस वाहनाने ट्राॅफीक जाम


:


खबरबात / गणेश जैन, शिरपूर
शिरपूर शहरातील मुख्य रस्त्यावरील *राम काँम्पलेक्स समोर* पोलिस गाडी तास भरा पासून उभी होती  सदर पोलिस गाडी मुख्य रस्त्यावर उभी असल्याने बसस्थानकाकडे जाणाऱ्या एसटी बसेस व आदी वाहनांनी ट्राँफीक जाम झाली होती त्याआधी एसटी चालकांनी कसीबसी बसेस काढून मार्गस्थ केली परंतु या बस चालकाने पोलिस गाडीचा अडथळा होत असल्याने चक्क बस च थांबवली बसेस मागे वाहनांची रांग लागली सदर पोलिस गाडी जवळ एक इसम गेला असता पोलिस गाडीत बसलेल्या महाशयाने ड्रायव्हर नसल्याचे सांगितले नेमकी पोलिस गाडी हाँस्पीटलच्या कामाकरिता आली होती का ? अजून अन्य कामासाठी आली होती याचे कारण मात्र समजले नाही या पोलिस गाडीच्या जागेवर खासगी वाहन उभे राहिले असते तर पोलिस दादाने काय केले असते एक तर मेमो घे नाही तर पोलिस ठाण्यात चाल अशी धमकावनी दिली असती असा सूर सर्व सामान्य माणसांकडून उमटत होते