सुर्यांश राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष मनोहर पाऊणकर

चंद्रपूर/प्रतिनिधी:
सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूरच्या वतीने महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सहयोगाने दिनांक २२ आणि २३ डिसेंम्बर २०१८ ला चंद्रपुरात ज्येष्ठ कवी आणि समीक्षक वसंत आबाजी डहाके यांचे अध्यक्षतेत राज्यस्तरीय साहित्य संमेलन होणार आहे. चंद्रपूरभूषण शांताराम पोटदुखे स्मृती समर्पित या दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे उदघाटन प्रख्यात वात्रटीकाकार व चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि कवी रामदास फुटाणे करणार असून संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर यांची संस्थेच्या वतीने एकमताने निवड करण्यात आली.
आज सूर्याश चे अध्यक्ष आणि कवी इरफान शेख यांनी मनोहर पाऊनकर यांचे संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ आणि आभारपत्र देऊन अभिनंदन केले. 
आपण या निमित्ताने साहित्याच्या एका वेगळ्या आयोजनाचे साक्षीदार होत असल्याचा आनंद पाऊनकर यांनी व्यक्त केला. संमेलनाला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आणि संमेलन यशस्वी करण्याचे मनोदय त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी विवेक पत्तीवार, प्रा. ललित मोटघरे, गीता रायपूरे, अशोक पवार आणि सुर्यांश च्या सदस्यांची उपस्थिती होती.