भाजपचे आजूबाजूला दोन गटातील मंडप ठरले विसर्जनाचे विदारक दृश्य !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाच्या वेळी गणेश भक्तांच्या स्वागतासाठी दरवर्षी लोकमान्य टिळक शाळेजवळ भारतीय जनता पक्षाचे मंडप उभारल्या जातात. मात्र यावर्षी आमदार सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर व आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर यांचे आजूबाजूला मंडप उभे करण्यात आले होते. यासाठी महानगरपालिकेचे माजी महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांच्या मंडळाला परवानगी दिल्याने, आमदार जोरगेवार यांच्या गटाचे भाजपचे शहराध्यक्ष शुभाष कासनगोटुवार यांनी महानगरपालिकेने दिलेल्या परवानगी वर जोरदार आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे भाजपतील दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने - सामने आलेत. या संपूर्ण कारणाम्याचे खापर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर फोडण्यात आले. दोन्ही गटांना समजूत घालण्याचा प्रयत्न माननीय आयुक्त यांनी केला. परंतु तो निष्पळ ठरला. शनिवारी विसर्जनाच्या वेळी पोलीस प्रशासनाला, व महानगरपालिकेला चांगली दमछाक करावी लागली. दोन्ही आमदारांनी एकमेका विरोधात प्राबल्य दाखवण्यासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करून विरोध दर्शवला. वर्चस्वाच्या लढाईसाठी दोन्ही आमदाराचे कार्यकर्ते तटस्थ भूमिकेत होते. पूर्वी याच पक्षाला वैचारिक पक्ष म्हणून भाजपकडे पाहिल्या जात होते. यांच्या दोन आमदाराच्या झगड्यात आयुक्त विपिन पालीवाल मात्र भरडले गेले. दोघांना वैयक्तिक भेटून समजवण्याचा प्रयत्न आणि चर्चा निष्पळ ठरल्या.मात्र इगो दुखावला गेला आणि वर्चस्वाच्या लढाईसाठी वैचारिकता वेशीवर टांगल्या गेली. हे संपूर्ण दृश्य चंद्रपूर जनतेने आपल्या डोळ्यानी पाहिले.
अनंत चतुर्थीला गणेश विसर्जना दरम्यान भक्ताच्या स्वागतासाठी एक भारतीय जनता पक्षाचे मंडप उभारल्या जात होते. दोन्ही गट आमने-सामने आल्याने मंडप उभारणीवरून गणेश विसर्जनादरम्यान दोन गटात मोठा तणाव निर्माण होईल या भीतीने पोलीस विभागाने बंदोबस्तासाठी चक्क ॲडिशनल एस पी चा पोलीस फौज फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला.
अख्ख्या चंद्रपूर शहरासह महाराष्ट्राचे लक्ष या दोन गटातील आमदाराकडे लागले होते. मी मोठा म्हणण्याच्या नादात भाजपाला येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत ह्या विदारक दृश्याचे चित्र आत्ताच दिसायला लागले आहेत.
एकेकाळी एकमेकांना गुरु -शिष्य समजणाऱ्या या आमदारात वर्चस्वासाठी का कलंगीतुरा रंगला असेल ? हे मात्र चंद्रपूरकरांना सांगण्याची आवश्यकता नाही?
आताचे शहर अध्यक्ष हे मुनगंटीवारांना आपले गुरु मानायचे परंतु सत्तेत वाहत्या प्रवाहावर जाताना फितूर होऊन आमदार जोरगेवार यांची साथ पकडली. परंतु जे आपलेच नाही झाले ते इतरांचे कसे होणार याचा सावध पवित्रा राजकारण्याने तरी घ्यावा! कारण सत्तेची मस्ती आणि पदाचा उन्नमाद माणसाला खालच्या स्तराला आणतो आणि एक दिवस नीतीमूल्याचा -हास होतो.
याचे ज्वलंत उदाहरण चंद्रपूरकरानी गणपती विसर्जनाच्या दरम्यान दोन गटात झालेल्या मंडपावरून अनुभवले. आता येणारी वेळ सांगेल भविष्यकाळात कोण कोणाच्या कान पिचक्या करतो ते... !