...येथे 28 तारखेपासून देशी दारूच्या नाहरकत प्रमाणपत्रा बाबत अन्नत्याग आंदोलन



...येथे 28 तारखेपासून देशी दारूच्या नाहरकत प्रमाणपत्रा बाबत अन्नत्याग आंदोलन

दिनचर्या न्युज

कोरपनाः

कोरपणा गावातील लोकांचा पूर्वीपासून सन 1992 पासून गावातील देशी दारू दुकानाला तीव्र विरोध होता यापूर्वी सुरू असलेले देशी दारू दुकान 1992 ला गावातील लोकांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून आम सभेत एकमताने ठराव पारित करून दादाजी विठोबा रणदिवे यांचे देशी दारूचे दुकान बंद केले. शांतता नांदत आहे तेव्हापासून गावात शांतता नांदत आहे,

त्यानंतर काही लोकांना हाताशी धरून पुन्हा सन 2011 ला शिंदेवाही येथील खोब्रागडे यांची देशी दारु दुकान कोरपणा ग्रामपंचायत येथे स्थलांतरित करण्याकरिता ना हरकला शिवेयात्र दिले होते परंतु गावातील लोकांनी माहिती मिळताच गावकऱ्यांनी ग्रामपंचायतला निवेदन देऊन देशी दारू ला दिल्लीला हरकत प्रमाणपत्र त्वरित रद्द करण्याचे निवेदन देत उपोषणाचा इशारा दिला होता त्यामुळे सदर देशी दारू दुकान सुरू झाली नाही

त्यानंतर ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायत मध्ये होताच (भांडुप) मुंबई येथील सौं. नंदा प्रल्हाद पौळ यांच्या देशी दारू दुकानाला सन 2023 ला परत देशी दारू दुकानांना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले, परंतु लोकांचा गावातील नागरिकांचे तसेच नगरसेवकांचे तीव्र विरोध असल्यामुळे तेही देशी दारूचे दुकान नगरपंचायत कोरपना हद्दी स्थलांतरित होऊ शकले नाही.

त्यानंतर मुख्याधिकारी यांना हाताशी धरून नियमबाह्य पद्धतीने नगरपंचायत अधिनियम डावलून "मेसर्स प्रेम लिकर प्रायव्हेट लिमिटेड" चे संचालक व्यंकटेश अगया बालसनिवार यांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले.

प्रेम लिकर प्रायव्हेट लिमिटेड या देशी दारू दुकानाला दि. 26/09/2011 रोजी बांधकामा परवानगीनुसार अधिकृत

बांधकाम असल्याबाबतचे प्रमाणपत्र दिले.

,2011 ला दिलेल्या बांधकामाची परवानगी ग्रामपंचायत ची होती मात्र ते काम 2024 त्यामुळे पर्यंत पूर्ण केले नसत्यामुळे बांधकाम परवानगी हे आपोआप रद्द होते नगरपंचायत हे 2015 पासून अस्तित्वात असताना 2024 पर्यंत बांधकामा अ पुरे असताना सदर बांधकामाची नव्याने परवानगी न घेता त्याच सर्वे नंबर मधील प्लॉट क्रं. 8 वर प्रमाणपत्र बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मुख्याधिकारी यांनी बेकायदेशीर रित्या दिले.

त्यानंतर लगेच 28/05/2025 ला आयोजित करून नियमबाह्य विशेष सभा आयोजित करून देशी दारू दुकान स्थलांतराकरिता ना हरकतप्रमाणपत्र दिले याच नियमबाह्य ठरावाच्या विरोधात गावकऱ्यांनी तसेच नगरपंचायत सदस्यांनी मोर्चा काढून मुख्याधिकारी नगरपंचायत यांच्या विरोधात केले मोठ्या प्रमाणात आंदोलन केले तसेच तहसीलदार कोरपणा यांना निवेदन दिले

कोरपणा नगरपरिषद मुख्याधिकारी धुमाळ साहेब यांना या बाबत विचारणा केली असता. ते म्हणाले की, विशेष सभेत ठराव मंजूर केला आहे.

विशेष सभेने घेतलेल्या ठरावावर नगरपरिषद अधिनियम 1965 मधील कलम 308 अन्वये ठरावावरती अपिल दाखल करण्यात आलेला आहे .

 परिपत्रक 2005 च्या नुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुख्याधिकारी यांनी आदेश नुसार नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्या मिटींगचे पत्र देण्यात आले आहे. ठराव घेण्यात आला असे उल्लेख नाही ते म्हणाले. 

माननीय जिल्हाधिकारी यांच्या दालनात 308 नुसार अपील दाखल केलेली आहे, गावकऱ्यांनी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सदर नगरपंचायतने दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द न केल्यास नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश असून शांतता व सुव्यवस्था भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच अन्नत्याग, आमरण उपोषण करण्याचा जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन दिलेले आहे परंतु शासनाने कुठल्याच प्रकारची दखल न घेतल्यामुळे आम्ही येत्या दि. 28/08/2025 पासून आमरण उपोषण (अन्नत्याग) करत असल्याचे आज झालेल्या पत्रकार परिषदेत सुनील बावणे, सतीश मोहितकर , पद्माकर मोहितकर, भास्कर मते, उत्तम गेडाम, विजय धानोरकर, यास अनेक शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व गावकरी यांनी पत्र परिषदेत कळविले आहे.