महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी कांग्रेसतर्फे 24 पासून आमरण उपोषण

   
चंद्रपूर-  महाराष्ट्र एस.टी कर्मचारी कांग्रेस चे विभागीय सचिव श्री गणेशसिंग बैस चालक चंद्रपुर आगार याची तात्पूरती बढ़ती चिमूर आगार सहा.वाहतूक निरीक्षक म्हणून देण्यात आली. त्याच्या सेवानिवृत्तीला 5 महीने राहिले असता त्याची विनंती बदली चंद्रपूर आगार येथे मागितली आहे .परंतु महामंडळ प्रशासन मागील 2 महिन्या पासून टाळाटाळ करून बदली करत नाही आहे या अन्यायच्या विरोधात नाईलाजास्तव महाराष्ट्र एस.टी कर्मचारी कांग्रेस चे सयुक्त सरचिटणीस चंद्रकांत काकड़े व कार्याध्यक्ष विजय बोरगमवार हे 24 दिसंबर पासून चंद्रपुर येथील मध्यवर्ती बस स्थानक समोर 5 वाजता आमरण उपोषण बसणार आहेत.अशी माहिती महाराष्ट्र एस.टी कर्मचारी कांग्रेस चंद्रपुर विभागाचे विभागीय अध्यक्ष राजेश सोलापन यांनी दिली .अश्या आशयाचे निवेदन विभाग नियंत्रक यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की , गणेशसिंग बैस चालक चंद्रपुर आगार यांची तात्पुरती बढ़ती चिमुर आगारात सहा.वाहतूक निरीक्षक म्हणुन देण्यात आली .बैस यांना सेवानिवृतिला फक्त5 महिन्याचा  कालावधि रहीलेला आहे.राज्य परिवहनच्या प्रचलित नियमाप्रमाणे कर्मचाऱ्यांला एका वर्षापेक्षा किंवा त्यापेशा कमी दिवस राहत असेल तर त्यांची बदली स्वगावी करावी असे परिपत्रक आहे .

चंद्रपुरला बदली करण्या संबंधात चर्चा सुद्धा झाली आश्वासन सुद्धा दिले. परंतु टाळाटाळचे उत्तर देत असल्यामुळे व अन्याय करण्याच्या विरोधात 24 रोजी पासुन आमरण उपोषणाला बसणार आहे.