"मदत" संघटनेच्या वतीने पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन !

नागपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्र दलित तरूण संघटना ( MAHARASHTRA DALIT TARUN SANGHAANA )  या शासनमान्य एनजीओ तर्फे " 16 वे " राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता सम्मेलन व पुरस्कार सोहळा रविवार दिनांक 16 डिसेंबर 2018 रोजी " गाडगे महाराज सभागृह मेडीकल चौक नागपूर " येथे आयोजित करण्यात आले आहे.
या सम्मेलनात अँट्रासिटी कायदा अधिक कडक व्हावा, देशातील वाढत्या बेरोजगारीबद्दल कार्यकर्ताची भूमिका, फुले-आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्ता च्या अडचणी या वर चर्चा होईल.
तसेच विविध क्षेत्रात सामाजिक काम करणारे शिक्षक, प्राध्यापक, डाँक्टर, पत्रकार, वकील, कलाकार, कवी, लेखक, सामाजिक-राजकिय कार्यकर्ता-कार्यकर्ती, कार्यकर्ते, गुणसंपन्न व कर्तृत्ववान व्यक्ती / महिला-पुरूष  विविध क्षेञातील महिलांना / पुरूष/ तरूण, यांना राज्यस्तरीय  समाजरत्न, राज्यस्तरीय समाजगौरव, राज्यस्तरीय शिक्षकरत्न, राज्यस्तरीय समाजभुषण, राज्यस्तरीय  नारीरत्न, राज्यस्तरीय नारीगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. राज्यस्तरीय पुरस्कार खालीलप्रमाणे ....
१) डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार
२) संत गाडगे महाराज विशिष्ट सेवा पुरस्कार
३) महात्मा ज्योतिबा फुले समाजगौरव पुरस्कार
४) डॉ.पंजाबराव देशमुख समाजभूषण पुरस्कार
५) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजवैभव पुरस्कार
६) डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पञकार पुरस्कार
७) क्रांतीज्योती साविञीबाई फुले नारीरत्न पुरस्कार
८) मातोश्री रमाबाई आंबेडकर नारीभूषण पुरस्कार
९) राष्ट्रमाता इंदिरा गांधी नारीवैभव पुरस्कार
१०) सर्वपल्ली डॉ.राधाकृष्णन शिक्षकरत्न पुरस्कार
११) छञपञी शिवाजी महाराज आदर्श समाजसेवक पुरस्कार
१२) माँ. जिजाऊ आदर्श समाजसेविका पुरस्कार.
या पुरस्कारांचे स्वरूप  सन्मानचिन्ह, दुपट्टा, मानपत्र, पुष्पगुच्छ, संविधानाचे पुस्तक हे पुरस्काराचे स्वरूप राहील.
इच्छुकांनी. आपले नांव व संपुर्ण पत्ता.श्री.बी.जी.शिंदे, महाराष्ट्र राज्य समन्वयक,  खालील WHATSAPP NO :- 9422472199 (व्हाँट्स अँप) वर पाठवावे.किवा CALL फोनला करावे.मोबाईल नंः-9422472199 / 8208936219.