चंद्रपूर प्रीमिअर लीगचे थाटात उद्घाटन

जेसीएल कप-2018-19


चंद्रपूर : नावाजलेल्या चंद्रपूर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं आज पोलीस फुटबॉल मैदानावर धडाक्यात उद्घाटन पार पडलं. 
सीपीएलच्या वतीने यावेळी जेसीएल कपचे आयोजन केले असून याचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून वेकोलीचे महाप्रबंधक आभासचंद्र सिंग उपस्थित होते. यावेळी बोलताना दोन्ही मान्यवरांनी आयोजनाचं कौतुक करून, खेळाडू घडवण्यासाठी अशा स्पर्धा महत्वाच्या असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन मोंटू सिंग यांनी केले.
23 डिसेंबर ते 9 जानेवारीदरम्यान ही स्पर्धा खेळली जाणार आहे. लेदारबॉलने खेळवल्या जाणाऱ्या टी-20 या स्पर्धेत 16 संघ सहभागी आहेत. यावेळी पहिल्यांदा ही स्पर्धा टॅर्फ म्हणजे गवती खेळपट्टीवर खेळवली जात आहे. 
या आयोजनासाठी लाईफ फाऊंडेशनचे रोषण दीक्षित, आरिफ खान, सुनील रेड्डी, बॉबी दीक्षित, नाहीद सिद्दीकी, शैलेंद्र भोयर, वसीम शेख, कमल जोरा, शहजाद सय्यद, डॉ. किशोर भट्टाचार्य, हर्षद भगत यांनी परिश्रम घेतले.

दरम्यान, आज झालेल्या सामन्यात चंद्रपूर बुलेट संघाने ताडोबा टायगर्स संघाचा 24 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून ताडोबा टायगर्सने गोलंदाजी घेतली. प्रथम फलंदाजी करीत चंद्रपूर बुलेट्स संघाने 5 गडी बाद 151 धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात ताडोबा टायगर्सने नऊ बाद 127 धावा काढल्या. विशेष म्हणजे चंद्रपूर बुलेट्स संघाचे कर्णधार डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आज फलंदाजी करून प्रेक्षकांचे लक्ष वेधले.