तिन्ही राज्यात काँग्रेस जिंकणे म्हणजे मोदींचा परतीच्या प्रवासाला सुरुवात:वडेट्टीवार

नागपूर/प्रतिनिधी:

राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोराम, तेलंगणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यातील तिन राज्यांमध्ये काँग्रेसने दमदार कामगिरी केली आहे. या वेळी विरोधी पक्षांकडून भाजप पक्षावर सर्वत्र टीका सुरू आहे.अश्यातच ब्रह्मपुरी नगर परिषद वर काँग्रेसचा झेंडा फडकावणारे महाराष्ट्र काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष आमदार विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान मोदींवर व भाजप सरकारवर टीका करत सच्चाई का बोलबाला झुटे कामुक आला म्हणत टिकास्‍त्र डागले आहे.

ते पुढे म्हणाले तिन्ही राज्यात काँग्रेस जिंकणे म्हणजे मोदींच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची सरकार येणार असून राहुल गांधींची पंतप्रधान पदाकडे वाटचाल करण्याचे संकेत आहेत.

राज्यात मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ या तिन्ही राज्यात काँग्रेसला स्पष्ट बहुमत जनतेनी दिला ही राहुल गांधी यांनी केलेली प्रचंड मेहनत आहे. राहुल गांधी अध्यक्ष होऊन १ वर्ष पूर्ण झाला आणी काँग्रेसनी अनेक वर्षाच्या भाजपाच्या सत्तेला सुरूंग लावला.याचाच अर्थ असा की, देशात मोदीचा करिश्मा संपला असून सच्चाई का बोलबाला झुटे का मूह काला याच म्हणीप्रमाणे केवळ खोट बोलून जनतेची दिशाभुल करून जनतेला ऐक वेळा फसवता येईल, पण वारंवार जनतेला फसवू शकत नाही, हे यावरून सिद्ध झाले आहे. देशातील जनता सत्तेचा माज, व उर्मट भाषेला बदलण्याचा राजकारणाला कदापीही सहन करत नाही हे यावरून सिद्ध झाले आहे. असे आमदार विजय वडेट्टीवार विजय उत्सव साजरा करतांना म्हणाले यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना शुभेच्छा देत सर्व कार्यकर्ता पदाधिकारी व जनतेचे आभार मानले.