जिल्ह्यात माजी आमदारासं 'या' काँग्रेस नेत्याचे भाजपात प्रवेश?



जिल्ह्यात माजी आमदारासं 'या' काँग्रेस नेत्याचे भाजपात प्रवेश?

चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का?

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
जिल्ह्यातील काँग्रेसच्या कुरघोडी राजकारणामुळे पक्षाचे मुरब्बी नेते, भाजपात प्रवेश करीत असल्याने जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे?
पुढील काही महिन्यात जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुका समोर असताना माजी आमदार अविनाश वारजूरकर, आणि जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष सतीश वारजूरकर यांनी मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे चिमूर विधानसभेचे आमदार बंटी भांगडिया हे या दोन्ही सख्ख्या भावाचे कट्टर विरोधक म्हणून यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढले. आता त्यांच्याच पक्षात त्यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याने जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे हा पक्षप्रवेश होत असल्याची चर्चा असून, आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील संघर्षाचा फटका पक्षाला बसत आहे.या घडामोडींमुळे चिमूर व ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात तसेच येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे एकनिष्ठ,खंबीर व मुरब्बी राजकारणी म्हणून या दोन्ही भावाची चिमूर विधानपरिषेत्रात ओळख आहे. यांच्या प्रवेशामुळे चिमूर विधान परिषद क्षेत्रात काँग्रेसला चांगला फटका बसणार असून याचा भाजपला येणारा जिल्हा परिषद निवडणुकीत यातील प्रवेशाचे खरे गणित उघडकीस येणार आहेत!