वाडीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष


वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे
मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान तेलंगणा व मिझोराम या राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका २८ नोव्हेंबर रोजी संपन्न झाले . मंगळवार ११ डिसेंबर रोजी निवडणूक मतमोजणीत भाजपाप्रणित मध्य प्रदेश, राजस्थान ,छत्तीसगड मध्ये भाजपचा दारुण पराभव झाला तर तेलंगाना व मिझोराम येथील मतदारांनी प्रादेशिक पक्षाला पसंती देत भाजपला दूर केले.देशात काँग्रेस पक्षातर्फे सर्वत्र जल्लोष करूनआनंद व्यक्त केला जात असून हा जनतेचा विजय असून हुकूमशाही विरुद्ध लोकशाही व महागाई विरुद्ध जनतेचाअसलेला रोषअसल्याच्या प्रतिक्रिया कुंदाताई राऊत, जिल्हा महासचिव दुर्योधन ढोणे, तालुका अध्यक्ष प्रकाश कोकाटे, हिंगणा विधान सभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अश्विन बैस, शहर अध्यक्ष शैलेश थोराने ,भीमराव लोखंडे,प्रतीक्षा पाटील,प्रमिला पवार,बेबी ढबाळे,संगीता जेम्स फ्रान्सिस आदींनी व्यक्त करीत कार्यकर्त्यांनी वाडीतील डॉ .आंबेडकर नगर येथील डॉ .बाबासाहेब आंंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मिठाई वाटून तसेच ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळून जल्लोष रॅली काढली.यावेळी स्थानिक नागपूर ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटी,हिंगणा विधानसभा युवक कांग्रेस तसेच वाडी शहर काँग्रेस कार्यकर्ते किशोर नागपूरकर,गौतम तिरपुडे,आशिष पाटील,संजय जीवनकर,नागोराव गवळी,पंकज फलके,पुरुषोत्तम लिचडे,नामदेव चवरे,योगेश कुमकुमवार,जेम्स फ्रान्सिस ,शशिकांत थोटे,श्रावन पक्क्ला ,फिरोज शेख,नितेश भारती,मिथुन वायकर,निकेश भागवतकर,अभिनव वडडेवार,सागर बैस,पियुश बांते, ईश्वर उघडे,आकाश तिरपुडे,सुधीर कांबले,रोहन नागपुरकर,गणेश बावने,रोहित मडामे,सांरग नागरीकर,अक्षय व्यापारी,महेन्द्र पटले,आकाश गायकवाड,अतुल देरकर,राज तिडके ,हिमांशु बावने,हर्ष वैदय,आबिद शेख,जावेद महाजन,लकी मेश्राम आदीं प्रामुख्याने उपस्थित होते.