दवलामेटीत रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी

वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे 

मेडिट्रिना मल्टीस्पेशालिटी सिटी लाईन हॉस्पीटल येथे सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत आरोग्य शिबिरात दवलामेटीवासियांनी गर्दी केली होती. याप्रसंगी सरपंच आनंदाताई कंपनीचोर, उपसरपंच गजानन रामेकर, ग्रामविकास अधिकारी विष्णू पोटभरे तसेच ग्रा. पं. सदस्य प्रभा थोरात ,प्रशांत केवटे यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मेणबत्ती अगरबत्ती लावून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आरोग्य शिबिराला सुरुवात करण्यात आली. आरोग्य शिबिरात हृदय रोग तपासणी व मार्गदर्शन, रक्त तपासणी, शुगर, डायबीटीज, स्त्रि रोग तज्ज्ञांकडून स्त्रीयांना मार्गदर्शन व सल्ला तसेच रक्तदान शिबिर घेण्यात आले. ग्रामविकास अधिकारी विष्णू पोटभरे यांनी रक्तदानाला सुरुवात केली. राज शेंडे, राम घडोले अशा १०२ लोकांनी रक्तदान केले आहे. याप्रसंगी माजी सरपंच संजय कपनीचोर, भीमराव मोटघरे, यादव गडपाल, प्रमोद केवटे, डॉ. उपेन्द्र कुमार, डॉ .समीर पालतेवार, डॉ .शिरीष जोशी तसेच परिचारिका उपस्थित होत्या.