राकाचे राजू मुरकुटे विविध समस्या घेऊन पोहचले मंत्रालयात

चिमूर/रोहित रामटेके:

चिमुर तालुक्यातील वन विभाग ,सामाजिक वनीकरण, राजनांदगाव वरोरा टॉवर ने शेतकऱ्यांवर केले अन्याय,रोजगार सेवक ना रुजू न करणे , एम आर इ जी एस ,या  गंभीर प्रश्न घेऊन न्याय मिळविण्यासाठी राष्ट्रवादी कांग्रेस जिल्हा उपाध्यक्ष राजू मुरकुटे यांनी अखेर मुंबई मंत्रालयात धाव घेऊन संबंधित मंत्री महोदयां ना व विरोधी पक्ष नेते धनंजय मुडे यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली
    एफडीसीएम खडसगी कार्यालय अंतर्गत कक्ष क्रमांक २५ उरकुडपार क्षेत्र २५ हेकटर कक्ष  क्रमांक १२६ गदगाव क्षेत्र २० हेकटर वृक्ष लागवडी करीता सन २०१८ मध्ये राखीव ठेवला असता शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड करण्याच्या ध्येय धोरण असताना सदर कक्षात काही हेकटर मध्ये खड्डे न खोदता वृक्ष लागवड केली नाही तेव्हा शासनाच्या परिपत्रकाची पुरेपूर अमलबजावणी झालेली नसल्याचे लक्ष्यात येत आहे यावरून या गैरप्रकाराची चौकशी करून कारवाई करण्यासाठी वन मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे .
     तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून राजनांद गाव वरोरा टॉवर लाईन चे काम झालेले असताना त्या तथाकथित शेतकऱ्यांना शासकीय परिपत्रकानुसार मोबदला मिळाला नाही तसेच उभ्या पिकात पोलीस संरक्षण घेऊन काम सुरू केले परंतु मोबदला दिला नाही यासाठी महसूल मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांना निवेदन दिले आहे .
  चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या कळमगाव येथील गणेश चौधरी हा रोजगार सेवक असून पस प्रशासने पत्र देऊन कामावरून काढले होते ग्रामीण विभाग चंद्रपूर यांनी सदर रोजगरसेवकास रुजू होण्याचे पत्र दिले असताना ही जिल्हाधिकारी कार्यलयात मात्र फाईल धूळखात पडली आहे न्याय मिळण्यात यावा यासाठी ग्रामीण मंत्री पंकजाताई मुंडें यांना निवेदन दिले आहे .
अश्या प्रकारे चिमूर तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी  राका जिल्हा उपाध्यक्ष राजू मुरकुटे यांनी मुबंई मंत्रालयात धाव घेऊन मंत्री महोदयांना निवेदन दिले तसेच विधान परिषद चे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना निवेदन देऊन मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून न्याय मिळविण्यासाठी निवेदन दिले
  निवेदन देत असताना राका जिल्हा उपाध्यक्ष राजू मुरकुटे,किशोर कुंभारे,कालिदास पाल ,प्रफुल चन्ने,  एकनाथ बांगडे आदी उपस्थित होते.