अनर्थ टळला ! रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे वाचले प्रवाशांचे प्राण


परभणी/ गोविंद महापति -
रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आहे. परभणीतील मुळी गावाजवळ रेल्वे रुळाला तडा गेला होता. या मार्गावरुन थोड्याच वेळात परभणी-पंढरपूर गाडी जाणार होती. मात्र रुळाला तडा गेल्याची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यानं त्वरित स्टेशन मास्तरांना दिली. त्यामुळे मोठा अपघात टळला.थंडीच्या दिवसांमध्ये अनेकदा रेल्वे रुळांना तडे जाण्याच्या घटना घडतात. त्यामुळेच रेल्वेकडून अधिक प्रमाणात गस्त घातली जाते. यामुळेच परभणीत मोठा अपघात टळला आहे. गंगाखेड ते धोंडी रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेला होता. ही बाब नाईंट पेट्रोलिंग करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या लक्षात आली. त्यानं प्रसंगावधान राखून याबद्दलची माहिती स्टेशन मास्तरांना दिली. त्यामुळे या मार्गावरुन जाणारी परभणी-पंढरपूर रेल्वे थांबवण्यात आली. यामुळे मोठा अनर्थ टळला.