श्री दत्तजयंती ऊत्सव सोहळा भक्तीभावात


साध्वी सर्वेश्वरीताई यांचे नेतृत्व


विनोद खंडारे/ नांदुरा
शहरातील श्री भवानी शंकर मंदिर, बढे हाॅस्पीटल परीसरातील शिवालय आश्रम येथे प्रतिवर्षनुसार यंदाही श्री दत्तजयंती ऊत्सव सोहळा मोठ्या भक्तीभावात झाला.
शुक्रवार दि. २१ डिसेंबर रोजी संस्थानचे श्री गजानन महाराज सभागृहात धुळे येथील वेदशास्त्रसंपन्न ब्रंम्हवृंदांचे पौरोहित्यात नवचंडी होमहवन, विधिवत महापुजा व सव्वालाख महामृत्युंजय जप विधीवत संपंन्न होऊन ऊत्सवाचा प्रारंभ करण्यात आला.
  शनीवार दि.२२ डिसेंबर ,,श्री दत्तजयंती,, रोजी सकाळी ८ वाजता ऊत्सवात सहभागी होण्यासाठी श्री गजानन महाराज पादुका श्रीक्षेत्र मुंडगांव येथील अध्यक्ष, तथा विश्वस्त,यांचे ,,श्रीं च्या,, पादुका पालखीसह आगमन झाले.त्यानंतर श्रीं ची तथा श्री दत्तगुरू यांची विधीवत स्थापना करण्यात आली.शिवालय आश्रमाच्या सर्वोसर्वा तथाऊत्सवाच्या आयोजक साध्वी सर्वैश्वरीताई यांनी ब्रंम्हवृंदाचे पौराहित्यात श्रीं चा रूद्राभिषेक करण्यात येऊन महाआरती करण्यात आली.या प्रसंगी विविध पंचपक्वांण्यांचा छप्पनभोग महानैवद्य अर्पण करण्यात आला.त्यानंतर महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घेतला.

    दुपारी ४ वाजता हभप रामभाऊ झांबरे यांचे नेतृत्वात भव्य दिंडी पालखी राजवैभवी शोभायात्रा नांदुरा शहराचे प्रमुख मार्गावरून काढण्यात आली.यामध्ये श्री गजानन महाराज पादुका संस्थान,मुंडगांव येथील भजनी मंडळ,गायनाचार्य,मुदुंगाचार्य,टाळकरी,अश्व, भगव्या पताकाधारी  तसेच अकोला येथील संकल्प ढोलताषा पथक ईत्यादिसह पंचक्रोशीतिल हजारो भाविक, महिला सहभागी झालेले होते.रात्री ८ वाजता शोभायात्रा शिवालय आश्रम येथे पोहोचल्यावर श्रीं ची शयन आरती केल्यावर ऊत्सवाची सांगता करण्यात आली.

    कार्यक्रमात श्री गजानन महाराज पादुका संस्थान, मुंडगांव चे अध्यक्ष ज्वारसिंग आसोले, ऊपाध्यक्ष गणेशराव कळसकार,हभप रामभाऊ महाराज झांबरे,डाॅ. ऊमेश बढे, गजानन पाटिल(आडोळ),शंकरराव गावंडे(निपाणा),सुरजरतन कोठारी,पीएसआय रमेश धामोळे, हरीभाऊ भिसे, मुकेश डागा, छोटुभाऊ तळोले,सचिन भिसे ईत्यादी मान्यवरसहभागी झालेले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समर्थ सदगुरू श्री रामचंद्र महाराज सेवा परीवार सदस्यासह अनेकांनी परीश्रम घेतले होते.