पतीने साडीने आवळला पत्नीचा गळा

उमेश तिवारी/कारंजा(घाडगे): 
पतीने पत्नीला साडीने गळा आवळुन मारल्याची घटना आज रविवार दुपारी १ वाजताच्या सुमारास कारंजा येथून जवळच असलेल्या येनगाव रस्त्यावर सोनेगाव (रिठे) या शिवारात घडली. आरोपी गोवर्धन तुळशिराम निकोसे(वय३८वर्ष) राहणार धावडी यांनी आपल्याच पत्नीची अर्चना गोवर्धन निकोसे (वय ३० वर्ष) तिच्याच साडीने गळा आवळुन जीवन यात्रा संपवून टाकली . मृतकाचे लग्नाला १३ वर्ष झाले होते. २ मुली आणि १ मुलगा असा मृतकाचा संसार होता.

पती पत्नी मध्ये नेहमीच वाद व्हायचा म्हणून मृतक ८ दिवसापासून माहेरी मासोद (कामठी) गेली होती. दि. २९/१२ ला आरोपी स्वतः जावून पत्नीची समजूत घालून गावाला आणले. आणि ३०/१२ तारखेला ही घटना घडली. आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. मृतकाची उत्तरीय तपासणी उदयाला ३१डिसेंबरला होईल.निकोसे हा परिवार धावडी(बु.) गावाचा असून कारंजामध्ये किरयाने राहत आहे. पुढील तपास कारंजा पोलीस करत आहे.