सर्व सामान्यांना आरोग्य सेवा मिळणे झाले कठीण

दुसाण्याला वैद्यकीय अधिकारी कधी 
गणेश जैन/धुळे, खबरबात बळसाणे : माळमाथा परिसरातील दुसाणे हे मुख्य बाजारपेठेचे गाव म्हणून ओळखले जाते आणि दुसाणे गावातच प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याकारणाने सर्वसाधारण नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या दुसाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या अनेक महिन्यांपासून नियमितपणे वैद्यकीय अधिकारी स्थानिक पातळीवर राहत नसल्याची नाराजगी रुग्णांच्या नातेवाईकांसह माळमाथा परिसरातील ग्रामस्थांनी केली होती शिवाय दुसाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात डाँक्टर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवा मिळणे कठीण झाले आहे त्यामुळे माळमाथा परिसरातील दुसाणे आरोग्य केंद्राला वैद्यकीय अधिकारी मिळणार तरी कधी असा प्रश्न माळमाथा परिसरातील जनतेकडून विचारला जात आहे शिवाय या भागात दुष्काळी परिस्थिती उदभवल्याने त्यात थंडीचा कहराने साथीच्या आजाराने जणूकाय मुक्काम च ठोकला आहे यामध्ये थंडी तापात असलेल्या सर्व साधारण कुटुंबातील रुग्णाला खासगी वाहनातुन दुसाणे आरोग्य केंद्र गाठावे लागते नेमके अशा परिस्थिती वैद्यकीय अधिकारी राहत नाही हजर असलेल्या कर्मचाऱ्यांमार्फत जेवढी आरोग्य सेवा त्या रुग्णाला पुरवली जाते तेवढेच काम कर्मचाऱ्याकडून केले जाते सर्दी , डोके दुखणे , पोट दुखणे , आंगपाठ दुखणे असले सर्वसाधारण आजारांना स्थानिक कर्मचारी सेवा बजावत असतात अशा किरकोळ आजार असलेल्या रुग्णांकरिता वैद्यकीय अधिकारी आदल्या दिवशी ही आला तरी रुग्णांचे भाग्य बलाढ्य समाजणे महत्त्वाचे आहे पण कदाचित रात्री अपरात्री बाळंतपण करिता किंवा परिसरात लहान मोठा अपघात झाल्यास तसेच पोटातील अँपेंडीक्स ची समस्या उदभवल्यास किंवा श्वानाने चावा घेतल्यास अशावेळी दुसाणे आरोग्य केंद्रात रुग्णाला खासगी वाहनातून आणले जाते आणि अशा प्रसंगी नेमणूकीत असलेले डॉक्टर शहारात वास्तव्याला राहतात उपस्थित कर्मचारी प्राथमिक उपचार करून निजामपूर , साक्री रुग्णाची परिस्थिती गंभीर राहिली तर जिल्हारुग्णालयात रवानगी करत असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जाते आणि रुग्णाच्या तब्येतीचे बरे वाईट झाल्यास यास जबाबदार कोण राहिल असा प्रश्न सर्वसामान्यांतून होत आहे

माळमाथा भागातील दुसाणे हे आरोग्य केंद्र महत्त्वाचे मानले जाते या केंद्राकरिता १ पद डाँक्टराचे , १ पद प्रयोगशाळा तंत्रज्ञ , २ पद रेग्युलर ( ANM) , ४ आरोग्य सेवक आणि १ स्लिपर ईत्यादी रिक्त पदे मंजूर असूनही पदांची नियुक्ती करण्यात आली नाही परंतु गेल्या काही वर्षांपासून मंजुरी असलेल्या रिक्त पदांना राज्य आरोग्य विभागातून सपशेल दुर्लक्ष केले जाते आहे दुसाणे आरोग्य केंद्र जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असले तरी राज्य आरोग्याकडून रिक्त पदांची नियुक्ती केली जाते परंतु जिल्हा परिषद प्रशासन व राज्य आरोग्य विभाग यांच्याती असमन्वयामुळे दुसाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी यांच्या सह इतर पदे नियुक्त करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे

या प्राथमिक आरोग्य केंद्रांर्तगत सात उपकेंद्राचा समावेश असून एकूण २९ गावे येतात त्या गावांची एकूण संख्या साधारणपणे साठ हजाराच्या आसपास आहे तसेच दुसाणे आरोग्य केंद्रासह जैताणे आरोग्य केंद्राचा अतिरिक्त भार एकाच डाँक्टरावर सोपविण्यात आला असून याच डाँक्टराला एका हप्त्यातून चार ते पाच दिवस कुटुंब नियोजन च्या कँम्प ला जावे लागत असल्याने सदर डाँक्टराला अजून एका डाँक्टराची खरोखर गरज असून उच्चशिक्षित डाँक्टरासह इतर पदे तात्काळ भरण्याची मागणी दुसाणे ग्रामस्थांसह माळमाथा परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे सद्याच्या स्थितीत ७ ते ८ कर्मचारी सेवा बजावत असल्याचे सांगितले व दुसाणे आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यासह इतर पदे नियुक्ती न झाल्यास आंदोलनाचा देखील इशारा दिला आहे