चंद्रपुरात ५००च्या हुबेहूब दिसणाऱ्या ९१ लाख रुपयाचा नोटा व साहित्य जप्त स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांची कार्यवाही




चंद्रपुरात ५००च्या हुबेहूब दिसणाऱ्या ९१ लाख रुपयाचा नोटा व साहित्य जप्त
स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांची कार्यवाही


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
१० मार्च २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेमधील अधिकारी व अंमलदार हे चंद्रपूर शहरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्तबातमीदार यांचेकडुन माहिती मिळाली की, चंद्रपुरात ५००च्या हुबेहूब दिसणाऱ्या ९१ लाख रुपयाचा नोटा व साहित्य जप्त .उर्जानगर मेजर गेट जवळ असलेल्या राजश्री अपार्टमेट फ्लॅट नंबर २०३ मध्ये काही इसम हे अवैधरित्या ५०० रू च्या रंगीत छायांकीत नोटा तयार करीत आहे सदर खबरेची माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने शिताफीने सापळा रचुन सदर ठिकाणी छापा टाकला असता सदर फ्लॅट ला ताला लागुन होता तेव्हा फ्लॅट मालक नामे श्री. सुमित कालीपथ पॉल, रा.बंगाली कॅम्प चंद्रपूर हयास बोलावून माहिती घेतली असता त्याने तो प्लॅट मागील एक महिन्यापासुन मध्यप्रदेश येथील राहणारे लोकांना किरायाने दिलेला असल्याचे सांगीतले त्यावरून सदर फ्लॅट मालक व पंचाचे समक्ष फ्लॅटवे लॉक तोडण्यात आले व फ्लॅट मालकाचे उपस्थितीत सदर फ्लॅटची झडती घेतली असता बेडरूमध्ये १० खरडयाचे बॉक्स त्यामध्ये भारतीय चलनाच्या चलनी नोटाप्रमाणे हुबेहुब दिसणा-या ५०० रू दराच्या रंगीत छायांकीत नोटा, एक EPSON कंपनीचे कलर प्रिंटर व इतर साहित्य असा एकुण ९१,१५,०००/- रू चा मुद्देमाल मिळुन आल्याने जप्त करण्यात आला. सदर ठिकाणी किरायाणे राहणारे आरोपीची गोपनीयरित्या माहिती काढुन त्यांचा शोध घेवून आरोपी नामे शुभम दिनेश नागर, वय २६ वर्ष, राह. पंचेड, तहसिल रतलाम, जि. रतलाम, राज्य-मध्यप्रदेश हयास ताब्यात घेवून नमुद आरोपीने फसवणुकीच्या उदद्देशाने सदरच्या रंगीत छायांकीत नोटा तयार केल्या असल्याने सदर आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन दुर्गापूर येथे अपराध कमांक १९६/२०२६ कलम ३१८(२), ३१८(३), ३३६(२),-३३६ (३), १८२(१) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे. दुर्गापूर करीत आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, चंद्रपूर, श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री. ईश्वर कातकडे, यांचे मार्गदर्शनात श्री. प्रमोद चौगुले उपविपोअधि चंद्रपूर, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक श्री. गौरव कार्यदेपाटील, प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन दुर्गापुर, पो. नि. श्री. अमोल काचोरे, स्थानीक गुन्हे शाखा, सहा. पोलीस निरीक्षक दिपक कांकरेडवार, सहा. पोलीस निरीक्षक बलराम झाडोकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, पोउपनि सुनील गौरकार, पोहवा /२१३८ जयसिंह, पोहवा /१४४६ सचिन गुरनुले, पोहवा /२५३५ संतोष येलपूलवार, पोहवा / २४९३ गणेश मोहुर्ले, पोहवा /२५४९ नितीन रायपूरे, पोहवा /२२९६ रजनीकांत पुट्टावार, पो.अं.१२३९/किशोर वकाटे, पोअं/२८७८ अजित शेंडे, चालक पोहवा दिनेश अराडे, प्रमोद डंभारे, महिला पोहवा निराशा तितरे/१५२२, विजयमाला वाघमारे/२३६८. छाया निकोडे/२३५२, अपर्णा मानकर / २८३५, महिला पोअं दिपीका सोडनार / २४९८. उषा लेडांगे/१२६७ यांनी केली आहे.