स्पोर्ट्स दिवस साजरा


नागपूर- आज वंडरर्लंड शाळा, नागपूर येथे स्पोर्ट्स दिवस साजरा करण्यात आला. या स्पोर्ट्स कार्यक्रमाचे विधिवत उदघाटन आमदार डॉ.परिणय फुके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका डॉ.परिणीता फुके, कॅप्टन पांडे, गुरजित कौर मॅडम, कमांडर नाथन, सौ नाथन, संगीता देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी विध्यार्थ्यांनी पथ संचालन, योगा अभ्यास करून दाखविला तसेच विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच या स्पर्धेचे पारोतोषिक वितरण नगरसेविका डॉ.परिणीता फुके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालक वर्ग, शिक्षक वर्ग व मोठ्या संख्येनी विध्यार्थी वर्ग उपस्थित होते.