जिल्हा परिषदच्या 92 दिव्यांग्याकडे युडीआयडी प्रमाणपत्र नाही, सात दिवसात प्रमाणपत्र न दिल्यास कारवाई !




जिल्हा परिषदच्या 92 दिव्यांग्याकडे युडीआयडी प्रमाणपत्र नाही, सात दिवसात प्रमाणपत्र न दिल्यास कारवाई !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
शासन परिपत्रकानुसार जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या विविध विभागातील दिव्यांग कर्मचाऱ्याकडे वैश्विक ओळखपत्र (UDID Card) तपासण्याची कार्यवाही करण्यात आली असता वैश्विक ओळखपत्र (UDID Card) सादर केले नसल्याचे आढळुन आले आहे.
शासन परिपत्रकानूसार आपण घेत असलेल्या दिव्यांगासाठीच्या सवलती/योजना इ.लाभ याद्वारे बंद करण्यात येत असुन, आपण तात्काळ ०७दिवसाचे आत वैश्विक ओळखपत्र (UDID Card) या कार्यालयास सादर करावे. असे जिल्हा परिषद कडून कळविण्यात आले आहेत. जिल्हा परिषद मध्ये कार्यरत असलेल्या 90 दिव्यांगाकडे युडीआयडी प्रमाणपत्र नसल्याची बाप समोर येत आहे.
जिल्हा परिषद मधील सर्वात जास्त शिक्षण विभागातील 56 दिवंगाकडे वैश्विक ओळखपत्र नसल्याचे आढळून आले आहे. पुरवठा विभागात एक सामान्य प्रशासन विभागात 18 दिव्यांग पसुसंवर्धन विभागात दोन, आणि बांधकाम विभागात एक या विभागातील दिव्यांग कडे युडीआयडी प्रमाणपत्रात पत्र नसल्याने त्यांना सात दिवसात प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषद कडून देण्यात आले आहे.
ज्या दिव्यांग व्यक्तीकडे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक १४ सप्टेंबर २०१८ चा शासन निर्णय निर्गमित होण्यापुर्वी शासनाने नेमून दिलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले दिव्यंगत्व प्रमाणपत्र आहे, तसेच उक्त शासन निर्णयान्वये स्थापन करण्यात आलेल्या वैद्यकीय मंडळामार्फत दिव्यांगत्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (UDID Card) प्राप्त करुन घेणे अनिवार्य आहे. वैश्विक ओळखपत्र (UDID Card) प्राप्त करुन घेण्यासाठी नोंदणी केल्यानंतर प्रत्यक्षात सदर ओळखपत्र प्राप्त होईपर्यंतच्या कालावधीसाठी सबंधीत दिव्यांग व्यक्तिंना दिव्यांगत्वाच्या सवलती/योजना यांचा लाभघेण्यासाठी त्यांचेकडे असलेले दिव्यांगत्व प्रमाणपत्रासोबत वैश्विक ओळखपत्रासाठीच नाव नोंदणी क्रमांक (Enrolment Number) सादर करणे अनिवार्य आहे.
एक वर्षाच्या मुदतीत जे दिव्यांग व्यक्ती उक्त मुदतीनंतरसुध्दा सदर प्रमाणपत्र प्राप्त करुण घेणार नाही ते दिव्यांगासाठीच्या सवलती/योजना इ.लाभ मिळविण्यास पात्र राहणार नाहीत असे निकष आहे. सदरचा कालावधी दिनांक २७ जून २०२५ ला समाप्त झालेला आहे.
याबाबत दिनांक ३ व ४ नोव्हेंबर २०२५ तसेच दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ ला जिल्हा परिषद चंद्रपुर अंतर्गत सर्व विभागातील दिव्यांग अधिकारी/कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तरसह यांचे दिव्यांगत्व प्रमाणपत्र/ वैश्विक ओळखपत्र (UDID Card) तपासण्याची कार्यवाही करण्यात आली असता आपण वैश्विक ओळखपत्र (UDID Card) सादर केले नसल्याचे आढळुन आले आहे.
शासन परिपत्रकानूसार आपण घेत असलेल्या दिव्यांगासाठीच्या सवलती/योजना इ.लाभ याद्वारे बंद करण्यात येत असुन, आपण तात्काळ ०७दिवसाचे आत वैश्विक ओळखपत्र (UDID Card) या कार्यालयास सादर करावे.
वैश्विक ओळखपत्र (UDID Card) सादर न केल्यास दिव्यांग व्यक्ती अधिनियम २०१६ मधील कलम ९१ (बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्तीसाठी असलेल्या कोणत्याही फायद्याचा फसवणूकीने फायदा घेतल्याबद्दल शिक्षा) कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे जिल्हा परिषदेच्या कळवण्यात आले.
जिल्हा परिषद च्या विविध विभागात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र असलेले कर्मचारी कार्यरत आहेत. अशा बोगस अपंगत्वाचे प्रमाणपत्रात घेणाऱ्यांना आता चांगलाच वचक बसणार असून फसवणूक केल्याचे आढळून आल्यास  त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार  असल्याने बोगस दिवांगाचे प्रमाणपत्र घेणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.