एचडीएफसी बॅंक शाखा बल्लारपूरच्या वतीने रक्तदान शिबीरबल्लारपूर/अमोल जगताप:

 चंदनसिंह चंदेल अध्यक्ष वनविकास महामंडळ महाराष्ट्र राज्य यांची आज दि.७/१२/२०१८ रोज शुक्रवार ला तहसील कार्यालय बल्लारपुर व एचडीएफसी बैंक बल्लारपुर च्या संयुक्त वतीने आयोजित रक्तदान शिबिर कार्यक्रमास अध्यक्षीय उपस्थिती लाभली.या प्रसंगी आदरणीय बाबुजी यांच्या शुभ हस्ते दिप प्रज्वलित करून शुभारंभ  केला मार्गदर्शन करतांना बाबुजी यांनी रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे.प्रत्येक मनुष्याने आपल्या जिवनात रक्तदान केले पाहिजे.रक्तदानाने कोणत्याही गरजुन्ना मदत होऊन तर लाभ होतो परंतु आपल्याला देखील आरोग्यात मोठा लाभ होतो. रक्तदान करण्यासाठी समाजातील प्रत्येक वरगांनी समोर येऊन यावर मोठी जनजागृती करत युवा पिढ़ीने वर्षातुन किमान दोन दा रक्तदान करावे असे मत व्यक्त केले.या प्रसंगी तहसीलदार श्री विकास अहिर व बैंक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.