जिल्हा परिषद कक्ष अधिकाऱ्यांना मारहाण


मनशिशिसेनेचा तीव्र निषेध 


वाडी (नागपूर ) /अरूण कराळे : -
जिल्हा परिषद शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी तथा कक्ष अधिकारी रमेश हरडे यांना कोणतेही कारण नसतांना धुडगूस घालून सोमवार २४ डिसेंबर रोजी मारहाण करणाऱ्या प्रवृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेत्तर सेनेच्या तातडीच्या सभेत तीव्र निषेध करण्याचा ठराव पारित करण्यात आला.
जिल्हा परिषद मध्ये सत्तापक्ष असलेल्या राजकीय नेत्याने सामंजस्याने चर्चा करून समस्या सोडविणे आवश्यक असतांना कनिष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करून राजकीय स्टंटबाजी निर्माण करण्याचा हा केविलवाणा प्रकार असल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्वाण शिक्षक शिक्षकेत्तर सेनेचे राज्य सरचिटणीस शरद भांडारकर यांनी व्यक्त केले.
शालेय पोषण आहार हा शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापकांच्या जबाबदारीचा विषय असून दूषित अन्नाचे नमुने शाळेत सील करून अन्न व औषध प्रशासनाकडे पाठवून पोलीस कारवाई करता आली असती मात्र निवडणूक डोळ्यासमोर ठेवून स्टंटबाजी करण्यात आली आहे.सभेला संजय चामट, मनोज घोडके, दिपचंद पेनकांडे, चंद्रकांत मासुरकर, प्रकाश कोल्हे, गुणवंत इखार, प्रवीण मेश्राम, मोरेश्वर तडसे, वामन सोमकुवर, अरविंद आसरे, अशोक डहाके, तुकाराम ठोंबरे, श्रीराम वाघे, हरिश्चंद्र दहाघाणे,प्रदीप दुरगकर, रामू नखाते, देविदास काळाने, ललिता रेवतकर, नितीन किटे, जावेद शेख, अनिता गायधने, कांचन मेश्राम, भावना काळाने, कल्पना व्यास दषोत्तर इत्यादी उपस्थित होते.
सदर बैठकीत बुधवार २६ डिसेंबर रोजी काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सर्व शिक्षकांनी काळ्या फिती लावून काम करण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्वाण शिक्षक शिक्षकेत्तर सेने कडून करण्यात आले आहे.