मोडी लिपी प्रशिक्षण कार्यशाळा लवकरच....

नागपूर/प्रतिनिधी:
Related image


छ.शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे वारसदार आपणच ना? मग आपण त्यांना देऊ आदरांजली आपल्या कृतीतून!

जागतिकीकरणामध्ये नव्या भाषा, कला निश्चितच शिकल्याच पाहिजेत, पण...... त्याबरोबरच आपल्या मातृभाषेचा अमूल्य ठेवा जतन करणे ही नैतिक जबाबदारी आपलीच आहे.

भुतकाळातील गोष्टींचा आढावा, अभ्यास भविष्यकाळातील वाटचालीस महत्वाचा ठरु शकतो !


इतिहासात प्राचीनकाळी मोडी लिपीचा वापर व्हायचा. आज कोट्यावधी कागदपत्रे, दस्तऐवज महाराष्ट्र व देश, विदेशात उपलब्ध आहेत. त्याचे वाचन होणे बाकी आहे.

त्यात लिहलेली मोडी लिपी आपल्याला वाचता येत नाही. त्यामुळे आपण इतिहासाच्या सत्यपणापर्यंत पोहोचत नाही. तसेच लाखो उपलब्ध दस्तऐवज वाचनाअभावी  नष्ट होत आहेत.
ही अडचण दूर व्हावी आणि विदर्भातील अनेक ऐतिहासिक मोडी लिपीतील दस्तावेज वाचता यावेत, यासाठी नागपूर येथे *मोडी लिपी अक्षर ओळख* ही प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा जानेवारी महिन्यात होईल. इतिहासप्रेमींसाठी ही सुवर्ण संधी असून, लवकरच तारीख आणि नोंदणीचे ठिकाण जाहीर करण्यात येईल.


चला तर मग.. चाळूया पाने इतिहासाची! चाखूया गोडी मोडी लिपीची!

अधिक माहिती
7264982465