महामेट्रो तयार करणार आकर्षक 'मेट्रो मॉल'



महानगरपालिका आणि महा मेट्रोमध्येसामंजस्य करार

नागपूर, ता. २० : जगातील प्रसिद्ध 'लंडन स्ट्रीट'च्या धर्तीवर नागपूर शहरात तयार होणाऱ्या 'ऑरेंज सिटीस्ट्रीट'च्या प्रस्तावित जागेवर (भूखंड क्रमांक १) आता आकर्षक मेट्रो मॉल तयार करण्यात येणार आहे. महामेट्रो नागपूर प्रकल्पाच्या जयप्रकाश मेट्रो स्टेशनसमोर हा मेट्रो मॉल तयार होणार आहे. यासाठी आजगुरुवार, २० डिसेंबर रोजी नागपूर महानगर पालिका आणि महा मेट्रो नागपूर यांच्यात सामंजस्य करार करण्यातआला. सिव्हील लाईन स्थित मेट्रो हाऊस मध्ये झालेल्या मनपा आणि महा मेट्रो यांच्या संयुक्त बैठकीत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित आणि महानगर पालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनीकरारावर स्वाक्षरी केली.

यावेळी महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, नगरसेवक तथा नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, उपायुक्त राजेश मोहिते, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर उपस्थित होते.

गुणवत्ता आणि कामाचा अवाका बघता महा मेट्रो नागपूरला शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पांचे काम हस्तांतरितकरण्यात आले आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या स्मार्ट सिटी संकल्पनेअंतर्गत ऑरेंज सिटीस्ट्रीट प्रकल्पाचे निर्माण होणार आहे. याअंतर्गत 'मेट्रो मॉल' व नागपूर शहरातील इतर विविध विकास कामेमहा मेट्रोच्या माध्यमातून होणार आहे. यात पर्यटनाच्या दृष्ठीने फुटाळा परिसर पुनर्निर्माण आणि रेल्वे स्टेशनसमोररील रस्त्याचे पुनः बांधकाम महा मेट्रो करणार आहे.



रेडिसन ब्ल्यू हॉटेल समोर हा मॉल तयार करण्यात येणार आहे. मेट्रो मॉलचे बांधकाम पूर्ण होताच हा मॉलमहानगर पालिकेला सुपूर्द करण्यात येईल. महत्त्वाचे म्हणजे जयप्रकाश नगर मेट्रो स्टेशन प्रास्तवित मॉलच्यातिसऱ्या माळ्यावर जोडण्यात येणार आहे. प्रस्तावित ३३०० चौरस मीटर जागेवर हा तयार होणार आहे. मॉलचेएकूण बांधकाम क्षेत्र १० हजार चौरस मीटर असेल. सुमारे ४५ मीटर उंच असलेल्या या मेट्रो मॉल मध्येएकूण आठ मजले यात असणार आहे. जयप्रकाश नगर मेट्रो स्टेशन समोर ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पाच्याप्रस्तावित जागेवर (भूखंड क्रमांक १) हा मॉल असेल.


एकूणच हा 'ऑरेंज सिटी प्रोजेक्ट' एकूण ३०.४९ हेक्टर इतक्या क्षेत्रफळात असून यात विविध विकास कामेकरण्याचे आयोजित आहे. मॉलच्या चौथ्या माळ्यावर दुकानांसाठी तर पाचव्या आणि आठव्या मजल्यावरकार्यालयासाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे. यात दुकानासाठी १७३५ चौरस मीटर तरकार्यालयासाठी ३२०० चौरस मीटर कार्पेट एरिया असेल. तसेच प्रस्तावित मेट्रो मॉल मध्ये पार्किंगसाठी दोनबेसमेंट ची सुविधा करण्यात येणार आहे. एकूण ४९ लहान चार चाकी वाहन, ९८ दुचाकी वाहन आणिसायकली एकाच वेळी याठिकाणी पार्क करता येणार आहे.