पेट्रोल पंप सुरू करण्याविषयी कार्यशाळा

युवक - युवतींचा उत्स्फुर्त प्रतिसाद


नागपूर दि. 21 : समाज कल्याण विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान व युवा करिअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती आणि जमातीतील उमेदवारांना नवीन पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज येथे आज एक दिवसीय नि:शुल्क मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी राज्य अनुसचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य सी. एल. थुलभारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडचे प्रादेशिक समन्वयक समीर डांगे,िलेश लाले, टेरीटरी कोऑर्डिनेटर समता प्रतिष्ठनचे लेखापाल चहांदे, युवा करियरचे संचालक मोनाल थुल आणि डॉ. आंबेडकर कॉलेजचे प्राचार्य श्री.पवार आदी उपस्थित होते.
प्रादेशिक समन्वयक समीर डांगे यांनी युवकांना केलेल्या मार्गदर्शनात सांगितले की२४ नोव्हेंबरला देशातील तीन पेट्रोल उत्पादन कंपन्यांनी जवळपास ६५ हजार पेट्रोल पम्प नव्याने सुरू करण्यासाठी जाहिराती दिल्या होत्या. आवेदनकर्ते पेट्रोल कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. सध्या नागपूर विभागात २६८ नवीन पेट्रोल पंप सुरू करण्याची योजना आहे. यासाठी उमेदवारांकडे पॅन कार्ड असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
एससी/एसटी प्रवर्गातील १० वी पास असलेला उमेदवार पेट्रोल पंपासाठी अर्ज करू शकतो. कार्यक्रमाला मार्गदर्शन करतांनाअनुसूचित जाती,जमातीसह मागासर्वीय व खुल्या प्रवर्गातीलही सुशिक्षित युवकांनी केवळ नोकरी मागणारा नव्हे तर नोकरी देणारा बनावे, असे आवाहन सी. एल. थूल यांनी केले.
कार्यशाळेला मोठ्या संख्येने युवक व युवतीची उपस्थिती होती. या सर्वांना भारत पेट्रोलियम कारपोरेशन लिमिटेडचे प्रादेशिक समन्वयक समीर डांगे यांनी अर्ज भरण्यासह संपुर्ण प्रक्रियेची माहिती दिली.