बाबरी मस्जिद विध्वंश प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात चालवा : राकॉपा

परभणी/ प्रतिनिधी:
     उत्तरप्रदेशातील अयोध्येतील बाबरी मस्जीदला ६ डिसेबर रोजी उध्वस्त करण्यात आले होते.यानंतर देशात दंगली उसळल्या हजारो लोकांना जीव गमवावा लागला त्यात काही मुस्लीम तर काही हिंदू होते. या घटनेमुळे देशाची प्रतिमा मलीन झाली आहे. देशातील  नागरीकामध्ये फूट पाडण्याचे काम काहीनी केले तर काहींनी आपली राजकीय पोळी भाजून घेतली. मुस्लीम समाजाच्या वतीने हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला जातो. अयोध्या प्रकरणाची सुनावणी लवकर करून न्याय देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयामार्फत राष्ट्रपतीने राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने देण्यात आला.
       बाबरी विध्वंस प्रकरणाला तब्बल २६ वर्षाचा कालावधी लोटला तरी न्यायालयाच्या वतीने निर्णय देण्यात आलेला नाही.बाबरी मस्जिद प्रकरणातील आरोपी अद्यापही मोकाटच असून त्यांना शिक्षा कधी होणार,सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी तातडीने निर्णय घेण्याची मागणी अनेक वर्षापासून होत आहे.प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे अशी शिफारत श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालात म्हण्टले आहे. या निवेदनावर प्रदेश सरचिटणीस अब्दुल खालेद, समाजसेवक अब्दुल बाखी, प्रदेश सचिव जलील पटेल, शहर जिल्हाउपाध्यक्ष रहेमान खान आदींच्या स्वाक्षºया आहेत.