देवेगाव शिवारात पुन्हा एक एकर उस जळून खाक


न प अग्नीशमन बंबामुळे मोठी हानी टळली


प्रतिनिधी/ पाथरी: -तालुक्यात आगोदरच पाण्या अभावी उभा उस वाळून जात असतांना पुन्हा विजेच्या तारां मुळे उस जळून नुकसान होण्याचे सत्र सुरूच असून गुरूवारी पावने चार च्या सुमारास देवेगांव शिवारात पुन्हा एक एक्कर उस, आणि बैलगाडी जळून शेतक-याचे मोठे नुकसान झाले. वेळीच पाथरी न प चा अग्नीशमन बंब पोहचल्याने मोठी हानी टळली.
बोरगांव येथील शेषनारायण आप्पाराव बेंडकर यांचा देवेगाव शिवारात तीन एक्कर उस असून गुरूवारी पावने चार वाजता विज तारांचे घर्षन झाल्याने या उसाला आग लागली. या वेळी अजुबाजूचे शेतकरी आणि पाथरी न प च्या अग्नीशमन बंबाने ही आग तात्काळ आटोक्यात आणली मात्र तो पर्यंत एक एक्कर उसा सह लाकडी गाडी आणि त्यातील दोन खताचे पोते जळाले होते मात्र या ठिकाणी या शेतक-यां सह इतरांचा उर्वरीत सहा एक्कर उस वाचवण्यान न प अग्नीशमन बंबाला यश आले. यात जवळ पास साठ टन उसा सह खत,आणि लाकडी गाडी असे सव्वा लाखावर नुकसान झाले आहे. या वेळी माजी उप सभापती माऊली गलबे यांच्या सह देवेगाव ग्रामस्थ आणि न प अग्निशमनचे जवान खुर्रम खान, शेख शेरु, बळीराम गवळी यांनी मोठे परिश्रम घेतले.