पहिले खोदलेल्या रस्त्यांची डागडुजी करा, नंतर नवीन खोदकाम करा

- किशोर जोरगेवार यांची मागणी
     अमृत कलश योजनेतील खोदकाम नागरिकांसाठी डोकेदुखी    बुधवारला मनपा समोर आंदोलनचंद्रपूर - अमृत कलश योजनेसाठी शहरातील संपुर्ण रस्त्यांचे खोदकाम करुन ते तसेच सोडून देण्यात आले आहे. परिणामी हे मार्ग आता नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे आता खोदलेल्या रस्त्यांची पहिले डागडूजी करण्यात यावी त्यानंतरच पुढील खोदकाम करावे अशी मागणी चंद्रपुर विधानसभा नेते किशोर जोरगेवार यांनी केली आहे. या मागणी करीता येत्या 26 तारखेला शुक्रवारी दुपारी दोन वाजता महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात येणार आहे.अमृत कलश योजनेतील पाईप लाईन टाकण्यासाठी संपुर्ण शहरातील रस्ते खोदण्यात आली आहेत. मात्र पाईप लाईन टाकण्याचे काम पुर्ण झाल्यावरही या रस्त्यांची डागडुजी करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहण करावा लागत आहे. यातील अणेक रस्त्यांवर खोदकामानंतर माती टाकण्यात आली आहे. मात्र दोन दिवस झालेल्या पावसामूळे या ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहे. तर अणेक ठिकाणच्या रस्त्यांवर दगड पसरुन असल्याने नागरिकांना प्रवास करत असतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या खोदकामामुळे अपघातही होत असून अणेक नागरिकांना दुखापत झाली आहे. काही भागात नागरिकांना स्वताची वहाणेही घरापर्यत नेणे अश्यक्य झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. असे असले तरी याबाबत संबधीत कंत्राटदार व महानगर पालिका दुर्लक्ष करत नागरिकांच्या अडचणीत आणखी भर घालत आहे. लाखो रुपये खर्च करुन चंद्रपूरातील काही रस्त्यांचे क्रॉक्रीटकरण करण्यात आले. तसेच रस्त्याकडेला गट्टृ लावून शुशोभीकरण करण्यात आले होते. मात्र नियोजन शुन्य कारभारामुळे लाखो रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेल्या रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. या खोदकामात रस्त्याकडेला लावलेल्या गट्टुंचेही नुकसाण झाले असून लाखो रुपयांचा चुराटा झाला आहे. अमृत कलश योजनेच्या नावावर संपुर्ण शहराचे विदृपीकरण करण्यात आले आहे. मात्र या पुढे हा प्रकार खपवून घेतल्या जाणार नाही असा ईशारा देत आजवर खोदकाम केलेल्या रस्त्यांची अगोदर डागडूजी करा त्यानंतरच पुढील खोदकामाला सुरुवात करा अशी मागणी जोरगेवार यांनी केली आहे. या मागणी करीता येत्या 26 तारखेला मनपा समोर निर्दशने करण्यात येणार असून या गंभिर समस्येकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेदण्यात येणार आहे. त्यांनतरही या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तिव्र आंदोलन केल्या जाईल असा ईशारा देण्यात आला आहें.