‘त्या’ जखमी बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यूनागपूर :- जबलपूर मार्गावरील देवलापार वन परिक्षेत्रातील राखीव जगलात गत आठवड्यात एका अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या  बिबट्याचा गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये आज रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार, जबलपूर मार्गावरील देवलापार मधील राखीव वन कक्ष क्रमांक ४९४ मधून जाणाऱ्या महामार्ग क्र.-७ नागपूर-जबलपूर मार्गावर अज्ञात वाहनाने मादा बिबड्याला १५ डिसेंबर रोजी धडक दिली. यात बिबट गंभीर जखमी झाला. त्याला नागपुरातील गोरेवाडा वन्य प्राणी बचाव केंद्रात उपचारासाठी आणले होते. या जखमी बिबट्याचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर बिबट्याचे शविच्छेदन करून गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील स्म्शानभूमीत दहन करण्यात आले.

यावेळी गोरेवाडाचे विभागीय व्यवस्थापक, वन्य जीव बचाव केंद्र गोरेवाडचे सहायक वनसंरक्षक, सेमिनरी हिल्सचे वनपरिक्षेत्र अधिकारी, डब्ल्यू.आर. टी. सी.चे डॉ. शालिनी, डॉ. सोमकुसरे, डॉ. सुजीत मॅथ्यू, डॉ. पावशे आदी उपस्थित होते. अशी माहिती विभागीय व्यवस्थापक एन.व्ही. काळे यांनी दिली.