पवनी येथे SDO द्या:प्रकाश पचारे यांची मागणी

मनोज चिचघरे/भंडारा पवनी:

पवनी तहसिल ही भंडारा उपविभागत महसूल येत असून भंडारा उपविभागीय अधिकारी महसूल यांनी आठवड्यात दोन दिवस पवनी तहसील कार्यालयात द्यावे अशी मागणी जिल्हाधिकारी शांतनु गोयल आणि उपविभागीय अधिकारी डॉ कृष्णानाथ पांचाळ यांना निवेदन देऊन केली.
यावेळी अखिल भारतीय मच्छिमार काँगेसचे सचिव प्रकाश पंचारे व माजी जि, पं, सभापती विकास राऊत ,राष्ट्रीय कॉग्रेस तालुका अध्यक्ष शंकरराव तेलमासरे ,व पवनी शहर काँग्रेस अध्यक्ष मनोहर उरकुडकर प्रकाश भोगे ,यांंनी ही मागणी केली आहे.
 पवनी तहसील ही भंडारा उपविभात येत असून उपविभागीय अधिकारी दर्जाचे कामे भंडारा येथून करावे लागते ,पवनी तालुक्यातील यात जनतेचा वेळ व पैसा वाया जात असतो, विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र व क्रीमिलियर सटिँफीकेट व जात वैधता प्रमाणपत्र तसेच शेतीविषयक वर्ग दोनचे वर्ग एकमध्ये करणे व इतर उपभिगागीय अधिकारी यांच्या दर्जाचे काम भंडारा येथील करावे लागते ,जनतेचा वे व पैसा खर्च होतो जर भंडारा उपविभागीय अधिकारी महसूल यांनी दोन दिवस पवनी तहसील येथे दिले तर जनतेचा वेळ आणि व पैशाची बचत होवू शकते याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे .