फक्त एक रुपयात आय.ए.एस.चे प्रशिक्षण

७६,००० हजार विद्यार्थी सहभागी

नागपूर/प्रतिनिधी:

 अमरावतीच्या डॉ.पंजाबराव देशमुख आय.ए.एस.अकादमीने सुरु केलेल्या मिशन आय.ए.एस.अतर्गत ज्यू आय.ए.एस ला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.फक्त एक रुपयात आय.ए.एस.चे प्रशिक्षण या उपक्रमात आतापर्यंत ७६००० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्याथ्र्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके विनामूल्य मिळणार आहेत अशी माहिती डॉ. पंजाबराव देशमुख आय.ए. एस.अकादमीचे संचालक प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. डॉ.पंजाबराव देशमुख आय.ए. एस.अकादमीच्या उपक्रमात आतापर्यंत १७३आय.ए.एस. आय.पी.एस,सनदी व राजपत्रित सहमागी झालेले आहेत.फकत १ रुपयात तिस-या वर्गापासून आय.ए.एस.चे प्रशिक्षण देणारी ही महाराष्ट्रातील पहिली अकादमी आहे.या उपक्रमात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण,सराव परीक्षा, मार्गदर्शन,गुणपत्रिका व प्रमाणपत्र यांचा समावेश आहे.शालेय जीवनापासून विद्याथ्र्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी या उदात्त हेतूने हा उपक्रम सुरु केलेला आहे.महाराष्ट्राचे राज्यपाल,योगगुरु श्री. रामदेवबाबा,अण्णा हजारे, पोपटराव पवार,बाबा आढा,डॉ श्रीराम लागू, सिंधुताई सपकाळ, प्रकाशबाबा आमटे,शिक्षणमंत्री श्री विनोद तावडे यांच्यासारख्या मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन या उपक्रमांची पाठराखण केली आहे.शालेय जीवनापासून स्पर्धा परीदोची तयारी करु इच्छिणा-या विद्यार्थ्यांनी,त्यांच्या पालकांनी,शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी नाव नोंदणी साठी प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे,संचालक,डॉ.पंजाबराव देशमुख आय.ए.एस.अकादमी, जिजाऊ नगर,विद्यापीठ रोड, अमरावती कॅम्प मो . ९८९०९६७००३ येथे संपर्क साधावा असे आवाहन अकादमीच्या प्रसिध्दीपत्रकातून करण्यात आले.