नागपुरात दुय्यम पोलीस निरीक्षका विरोधात बलात्काराची तक्रार

पीडिताची पोलीस आयुक्तांकडे धाव
जाधव भितीपोटी वैद्यकीय रजेवर
अरूण कराळे/नागपूर:

वाडी पोलीस स्टेशन येथे कार्यरत दुय्यम पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव यांनी सरकारी नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून तरुणीशी प्रेमसंबंध साधत शारीरिक शोषण केल्याची घटना समोर आल्याने वाडी पोलिसात खळबळ माजली असून जाधव वैद्यकीय रजेवर गेले आहेत . प्राप्त सूत्रांच्या माहितीनुसार पिडिता ही नागपूर शहरातील शिवणगांव परिसरातील असून पोलीस विभागातून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मुलगी असल्याची माहिती पुढे येत असून ती वाडी पोलीस स्टेशनला काही कामानिमित्त आली असता प्रशांत जाधव यांच्या संपर्कात आली असता मी तुला सरकारी नोकरी लावून देतो 
असे खोटेआमिष दाखवीत तिला प्रेमजाळ्यात ओढले. व मागील अंदाजे पाच महिन्यापासून डिफेन्स कॉर्टर मधील सेक्टर नंबर ६ , १ / ३ / ७१ मध्ये नेऊन जाधवने वारंवार शारीरिक शोषण करून मारपीठ केली.दोघांमध्ये वाद झाला.आपली फसवणूक झाली असल्याचे पीडिताच्या लक्षात येताच ती वाडी पोलीस स्टेशनला संबंधित अधिकाऱ्यांना भेटायला वारंवार यायची पण त्याची भेट व्हायची नाही किंवा तो टाळाटाळ करायचा.शेवटी पिडिताने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची लेखी तक्रार पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्य यांच्याकडे केली असता या प्रकरणाची चौकशी डीसीपी विवेक मसाळ यांचेकडे दिली असून तक्रारीची कुणकुण प्रशांत जाधव यांना होताच एक जानेवारी पासून वैद्यकीय रजेवर गेले असले तरी ते कोणत्याआजाराने आजारी आहेत,कुठे उपचार घेत आहे याचीही शहनिशा होणे ते गरजेचे आहे.वाडी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाच्या अशाच प्रकारच्या प्रकरणाची चर्चा सध्या वाडी पोलीसात व परिसरात चर्चेत असून वरिष्ठ अधिकारी याकडे कसे काय दुर्लक्ष करतात?यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे असुरक्षतेचे वातावरण निर्माण झालीआहे.रक्षकच भक्षक बनत असतील तर सर्वसामान्यांनी न्याय कुणाकडे मागायचा.जाधव यांचेशी भ्रमणध्वनी वरून संपर्क केला असता ते फोन रिसिव्ह करीत नाही.