निबंधात सलोनी घोडेस्वार तर वक्तृत्त्व स्पर्धेत नंदिनी कुंभरे अव्वल


भारत सरकारचा उपक्रम

विमलताई तिडके विद्यालयात स्पर्धा
वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे:


स्वच्छता व आरोग्य या विषयाबाबतचा प्रचार करण्याचे उद्देशाने सूचना व प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांचे उपक्रमांतर्गत प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था नागपूर द्वारा बुधवार २ जानेवारी व गुरुवार ३ जानेवारी रोजी आरोग्य व स्वच्छता या विषयावर निबंध,वक्तृत्त्वकला तसेच जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
उपक्रमांतर्गत इयत्ता आठवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता .यामध्ये निबंध स्पर्धेत सलोनी घोडेस्वार,वक्तृत्वकलेत नंदिनी कुंभरे अव्वल ठरल्यात.विजेते स्पर्धकात श्वेता साहरे,श्रुती राऊत,तनु माने,आचल मडामे,आयुष पाटील,गुलशन शेंडे,रश्मी काळे,साक्षी चव्हाण आदी गुणवंत ठरले.विजेता स्पर्धकांना नगर परिषद वाडीचे उपमुख्याधिकारी आकाश सहारे,प्रादेशिक विद्या प्राधिकरण विज्ञान व गणित शिक्षण संस्थेचे अधीक्षक निलेश चव्हाण,स्वच्छता व पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषदचे समन्वयक दिनेश मासोतकर,क्षेत्रीय प्रचार अधिकारी मनोज सोनवणे,राज्य विज्ञान संस्थेच्या प्रा .सरिता मंगेश,क्षेत्रीय प्रचारक संजय तिवारी,मुख्याध्यापिका साधना कोलवाडकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करून गौरविण्यात आले.आयोजनासाठी अनिल धोटे,सुधाकर धिरडे,दिगांबर गोहणे,किशोर गरमळे,श्रावण ढवंगाळे,संदीप लापकाळे,माया रामटेके,शीतल अवझे,अश्विनी फलके,सुरेखा घागरे आदींनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे संचालन सुरेश फलके तर आभार वंदना पाटील यांनी मानले .